सौरऊर्जा प्रकल्प ते कनेक्टिव्हिटीत वाढ; मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्वपूर्ण घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 10:59 AM2021-09-17T10:59:49+5:302021-09-17T11:01:38+5:30
Marathwada Mukti Sangram Din : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते पैठण येथील संतपीठाचे (Sant Peeth) ऑनलाईन लोकार्पण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली पैठण येथील संतपीठ पाच अभ्यासक्रमासह सुरू होत आहे. लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे यांनी हे मोठे विद्यापीठ व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खा. इम्तियाज जलील आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच त्यांचे उपहात्मक स्वागत करण्यासाठी विमानतळावर गेलेल्या एमआयएम कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांचा ताफा अडविण्याचा इशारा देणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पोलिसांनी ताब्यात घेतले. कलम 154 अन्वये रात्री ही कारवाई केली.
मराठवाड्याच्या विकासासाठी :
- मराठवाड्यात 200 मेगा व्हॉल्टचा सौरऊर्जेचा प्रकल्प -औरंगाबादमध्ये दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणार
- औरंगाबाद - शिर्डी या 112.40 किमी मार्गाची श्रेणीवाढ करण्यात येणार
- समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या 194.48 किमीच्या जालना- नांदेड महामार्गाला गती देणार
- औरंगाबाद सफारी पार्क जगातले वैशिष्ट्यपूर्ण करणार
- मराठवाड्यातील 150 निजामकालीन शाळांचा पुनर्विकास करणार
- हिंगोली येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी 6 कोटी निधी
- औरंगाबाद -अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना
- औरंगाबाद - शिर्डी हवाई सेवेची चाचपणी
- सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी 382 कोटी रुपये
- औरंगाबाद : मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी 317. 22 कोटी रुपये निधी नगरोत्थानमधून
-परभणी शहरात भूयारी गटार योजनेच्या कामासही गती. 350 कोटी रुपयांची तरतूद
- परभणीसाठी जल जीवन अभियानातून अतिरिक्त पाणी पुरवठा योजना. 105 कोटी
- उस्मानाबाद शहरासाठी 168.61 कोटी रकमेची भूमीगत गटार योजना
-औरंगाबाद : 1680 कोटींच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश
- हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योगासाठी4.50 कोटी
- औरंगाबाद - शिर्डी या 112.40 किमी मार्गाची श्रेणीवाढ
- समृद्धीला जोडणाऱ्या 194.48 किमीच्या जालना- नांदेड महामार्गाला देखील गती देणार
-औरंगाबाद सफारी पार्क जगातले वैशिष्ट्यपूर्ण करणार
- औरंगाबाद शहरातील गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रीया वेगाने करावी असे निर्देश
-हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकासासाठी 86.19 कोटी रुपये
- नरसी नामदेव मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी 66.54 कोटी रुपये निधी
- घृष्णेश्वर मंदिर सभामंडप विकास कऱण्यासाठी वाढीव २८ कोटी रुपये