कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कोरोना चाचण्या वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:06 AM2021-02-23T04:06:32+5:302021-02-23T04:06:32+5:30
सोमवारी सायंकाळी मनपा मुख्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांची ...
सोमवारी सायंकाळी मनपा मुख्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. लसीकरणासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी, सार्वजनिक ठिकाणी आणि विविध कार्यक्रमांना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.
१४७३ नागरिकांची तपासणी, ५८ पॉझिटिव्ह
औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सोमवारी शहरात १४७३ नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली. अँटिजेन पद्धतीने ३५८ नागरिकांची टेस्ट केली, त्यामध्ये तब्बल ५८ पॉझिटिव्ह आढळून आले. १ हजार ११५ नागरिकांच्या लाळेचे नमुने घेतले. मंगळवारी सकाळी त्यांचा अहवाल प्राप्त होईल.
३ लाख ६० हजार रुपयांची वसुली
औरंगाबाद : मालमत्ता कर आणि पाणीपट्टीसाठी महापालिकेने स्वतंत्र टास्क फोर्स तयार केले आहे. सोमवारी या पथकाने शहरातील वेगवेगळ्या भागातून ३ लाख ६० हजार रुपये मालमत्ता कर आणि पाणीपट्टी जमा केली.
विमानातून आलेल्या ७७ पैकी दोन जण पॉझिटिव्ह
औरंगाबाद : रविवारी मुंबईहून आलेल्या ७७ प्रवाशांची विमानतळावर कोरोना तपासणी करण्यात आली. त्यातील दोनजण सोमवारी पॉझिटिव्ह आढळून आले. सोमवारी विमानतळावर ६८, रेल्वे स्टेशनवर १३०, जाधववाडी भाजी मंडईत २३, तर सोमवारच्या आठवडी बाजारात तीन नागरिकांची तपासणी करण्यात आली.