नगरसेवकांच्या मानधनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:09 AM2017-07-31T01:09:58+5:302017-07-31T01:09:58+5:30

महाराष्टÑ शासनाने १५ जुलै रोजी राज्यातील सर्व महापालिकांमधील नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला.

Increase in corporator's honourarium | नगरसेवकांच्या मानधनात वाढ

नगरसेवकांच्या मानधनात वाढ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने १५ जुलै रोजी राज्यातील सर्व महापालिकांमधील नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. औरंगाबाद महापालिकेतील नगरसेवकांना पूर्वी साडेसात हजार रुपये मानधन मिळत होते. आता शासन आदेशानुसार दहा हजार रुपये मानधन मिळणार आहे. मानधन अदा करण्यासाठी स्थायी समितीची मंजुरी आवश्यक असल्याने याच महिन्यात प्रशासनाकडून ठराव ठेवण्यात आला आहे. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
सभापती गजानन बारवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत मानधनवाढीचा ठराव ठेवण्यात आला आहे. नगर विकास विभागाने १५ जुलै रोजी राज्यातील सर्व महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा अध्यादेश जारी केला आहे. या आदेशानुसार बृहन्मुंबई वगळता राज्यातील इतर मनपातील सदस्यांच्या मानधनात वर्गवारीनुसार वाढ केली आहे. औरंगाबादेत नगरसेवकांना साडेसात हजारांऐवजी आता दहा हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. शासन आदेशाचा संदर्भ देत मनपा प्रशासनाने १५ जुलैपासून हे वाढीव मानधन देण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवला आहे.
सध्या मनपात ११३ लोकनियुक्त आणि ५ स्वीकृत असे एकूण ११८ नगरसेवक आहेत. या नगरसेवकांच्या मानधनावर आतापर्यंत वर्षाकाठी १ कोटी ८ लाख रुपये खर्च होत होते. आता हा खर्च १ कोटी ४४ लाख रुपये इतका होणार आहे. याशिवाय पालिकेतील पदाधिकारी, विषय समिती सभापती, प्रभाग समिती सभापती यांच्या मानधनावरही सुमारे ३६ लाख रुपयांचा खर्च होत असल्याचे सूत्रांनी नमूद केले.

Web Title: Increase in corporator's honourarium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.