‘त्या’ खुरट्या पुलाची उंची वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:27 AM2017-09-18T00:27:13+5:302017-09-18T00:27:13+5:30

उस्मानपुरा ते सातारा रस्त्यातील नदीवरील पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी होत आहे.

 Increase the height of the 'bridge' | ‘त्या’ खुरट्या पुलाची उंची वाढवा

‘त्या’ खुरट्या पुलाची उंची वाढवा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : उस्मानपुरा ते सातारा रस्त्यातील नदीवरील कमी उंचीच्या पुलावरून पुरात वाहून गेल्यामुळे चार दिवसांपूर्वीच एका तरुणाचा बळी गेला. त्यामुळे मनपाने या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सातारा व परिसरातील विविध वसाहतींना हा जवळचा मार्ग असल्याने याच रस्त्याने २४ तास गर्दी असते. या पुलावरून बाराही महिने पाणी वाहत असल्याने त्या पाण्यातून चालक वाहने पळवितात. रस्त्यावरून वाहणारे पाणी नागरिकांना कधी शंका आणणारे वाटले नाही. त्याविषयी कुणी प्रशासनाकडे रीतसर तक्रारदेखील केली नाही. त्यामुळे बिनबोभाटपणे रस्त्यावरून नागरिकांची ये-जा सुरू असते; परंतु नुकताच दुचाकीस्वार वाहून त्याचा बळी गेल्याने वाहनचालक आता पाण्यातून जाण्याची हिंमत करण्याचे टाळत आहेत.
नाला ओलांडून शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल, मंगल कार्यालय तसेच सातारा खंडोबा देवस्थान असल्याने दररोज शहरातून येणाºयांच्या गर्दीत खंड पडलेला नाही. महानगरपालिका हद्दीत असूनदेखील पुलासाठी काही उपाययोजना केल्या नसल्याने अपघाताचा प्रकार घडला आहे.
जनतेसाठी मनपाने पाऊल उचलावे...
सातारा व परिसरातील नागरिकांना शहरात जाण्यासाठी हा अत्यंत जवळचा मार्ग असून, पंचक्रोशीतील नागरिक याच रस्त्याचा सर्रास वापर करीत आहेत; परंतु अपघाताची घटना घडल्याने नागरिकांतून भीती व्यक्त होत आहे. याच रस्त्यावर रुग्णालय असल्याने शहरातून बहुतांश नागरिक संग्रामनगर पुलाचा वापर टाळून उस्मानपुरा ते सातारा असा जुन्या रस्त्याचाच वापर करतात. महापालिका हद्दीत हा रस्ता मनपा स्थापनेपासून आहे; परंतु पूल बांधण्यासाठी पावले उचलली नसल्याची खंत माजी पंचायत समिती सदस्य जावेद पटेल यांनी व्यक्त केली.
महानगरपालिकेत मागणी लावून धरणार...
जवळचा मार्ग असल्याने सातारा व तांडा परिसरातील नागरिक उस्मानपुरा रेल्वेगेटपासून एमआयटी सातारा रस्त्याचा वापर करतात. शहरातील ड्रेनेजचे सांडपाणी याच नाल्यातून बाराही महिने वाहत असते. विद्यार्थी, नागरिकांना या रस्त्याने जाताना असुरक्षितता निर्माण झाली आहे. त्याकरिता मनपाच्या वतीने नाल्यात पूल बनवावा, अशी मागणी सातारा वॉर्डाच्या नगरसेविका सायली जमादार यांनी केली आहे.

Web Title:  Increase the height of the 'bridge'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.