पर्यटकांच्या संख्येत होतेय वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:38 AM2017-09-27T00:38:30+5:302017-09-27T00:38:30+5:30
दैनंदिन कामकाजातील ताण-तणाव दूर करण्याच्या दृष्टीकोनातून पर्यटनाला जाणाºयांची संख्या जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असून यासाठीच्या सुविधा थेट परभणीतच मिळू लागल्याने पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस येऊ लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दैनंदिन कामकाजातील ताण-तणाव दूर करण्याच्या दृष्टीकोनातून पर्यटनाला जाणाºयांची संख्या जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असून यासाठीच्या सुविधा थेट परभणीतच मिळू लागल्याने पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस येऊ लागले आहेत.
२७ सप्टेंबर १९७० रोजी जागतिक पर्यटन संघटनेचे संविधान स्वीकारले गेले. त्यानंतर पर्यटनाविषयीची लोकप्रियता वाढत असल्याने संयुक्त राष्ट्रसंघाने २७ सप्टेंबर १९८० पासून जागतिक पर्यटन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गेल्या ३६ वर्षापासून सातत्याने जागतिकस्तरावर पर्यटन दिन साजरा केला जातो. यानिमित्त देशात पर्यटन विभागाच्या वतीने वेगवेगळ्या थीमही राबविल्या जातात. केंद्र व राज्य शासनही पर्यटनाकडे गांभीर्याने पाहत आहे. या अनुषंगाने स्वतंत्र विभागही स्थापन करण्यात आला असून त्या विभागाच्या माध्यमातून पर्यटन व्यवसायाला चालना दिली जात आहे. एकीकडे शासकीयस्तरावरुन पर्यटनाला महत्त्व दिले जात असताना सर्वसामान्यांनाही पर्यटनाची ओढ लागली आहे. आजच्या धकधकीच्या काळात दैनंदिन कामकाजातून ताण-तणाव निर्माण होत असल्याने हा तणाव दूर करण्यासाठी मित्र, कुटुंबासह पर्यटनाला जाणाºयांची संख्या वाढू लागली आहे. या संदर्भात गेल्या ११ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असलले परभणी येथील केसरी टुर्सचे एजंट नंदू तापडिया म्हणाले की, दरवर्षी परभणी शहरातून देशांतर्गत पर्यटनासाठी केरळ, जम्मू काश्मिर, राजस्थान, गोवा, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, पंजाब आदी ठिकाणी जवळपास १ हजार नागरिक जातात. शिवाय विदेशातही परभणीतून दुबई, स्वीत्झलॅन्ड, अमेरिका, सिंगापूर, थायलंड, श्रीलंका, नेपाळ आदी ठिकाणी ४०० ते ५०० नागरिक जातात. याशिवाय तिरुपती, दक्षिण भारत, वैष्णवी देवी, अमरनाथ, ब्रदीनाथ, केदारनाथ आदी धार्मिक स्थळावरही जाणाºयांची संख्या अधिक आहे. पर्यटनाला जाण्यासाठी काही खाजगी कंपन्यांचे पॅकेज उपलब्ध आहेत. याशिवाय स्वत:हून काही मंडळी फिरण्यासाठी जातात.
यासाठी जवळपास ६ महिने अगोदरपासून बुकिंग केली जाते. देशात पर्यटनाला जाण्यासाठी कमीत कमी एका व्यक्तीला १८ हजार रुपये लागतात. सेवेचा दर्जा व येण्या-जाण्याचे माध्यम यावरुन खाजगी कंपन्यांकडून पर्यटनाचे पॅकेज ठरविले जाते, असेही नंदू तापडिया म्हणाले.