नांदर आरोग्य केंद्राच्या ओपीडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:05 AM2021-09-03T04:05:05+5:302021-09-03T04:05:05+5:30
नांदर आरोग्य केंद्र हे कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून रुग्णसेवेसाठी तत्पर आहे. डॉ. आशा टेपाले, डॉ. संदीप रगडे हे दोन वैद्यकीय ...
नांदर आरोग्य केंद्र हे कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून रुग्णसेवेसाठी तत्पर आहे. डॉ. आशा टेपाले, डॉ. संदीप रगडे हे दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. या रुग्णालयाअंतर्गत एकूण २७ गावे असून, सहा उपकेंद्रे कार्यरत आहेत. सध्या नांदर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या २० कर्मचाऱ्यांच्या वतीने २७ गावांत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शिबिर घेतले जात आहे. आतापर्यंत १४ हजार ९१७ नागरिकांना लसीकरण केले गेले आहे. केंद्राअंतर्गत हे प्रमाण ५० टक्क्यांवर आले आहे.
---
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत दावरवाडी व नांदर ही सर्वांत मोठी गावे आहेत. लसीकरणाचे काम चांगले सुरू आहे. सध्या व्हायरल असल्याने ओपीडी वाढली. नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य केेंद्रात येऊन योग्य ते उपचार घ्यावे. - डॉ. संदीप रगडे, वैद्यकीय अधिकारी.
020921\img-20210902-wa0019.jpg
(१)छाया : नांदर ता पैठण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्नांची तपासणी करतांना वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप रगडे व डॉ आशा टेपाले...( छाया : अंबादास एडके )