जलसाठ्यात वाढ
By Admin | Published: September 2, 2014 12:55 AM2014-09-02T00:55:56+5:302014-09-02T01:49:10+5:30
हिंगोली : जिल्ह्यात मागील ४८ तासांपासून संततधार पावसामुळे नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. चार पाझर तलाव ओव्हरफ्लो झाले असून उर्वरित ६ तलाव भरण्यास २ ते ३ मीटर पाण्याची आवश्यकता आहे.
हिंगोली : जिल्ह्यात मागील ४८ तासांपासून संततधार पावसामुळे नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. चार पाझर तलाव ओव्हरफ्लो झाले असून उर्वरित ६ तलाव भरण्यास २ ते ३ मीटर पाण्याची आवश्यकता आहे. प्रमुख धरणांपैैकी इसापूरमध्ये ५ तर येलदरी धरणात २ टक्के पाण्याची वाढ झाली. समतल जमिनीत पाणी साचल्याने काही ठिकाणी पिके पाण्याखाली गेल्याने नुकसानीला सुरूवात झाली.
मघाच्या पूर्वाधार्त हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. उत्तरधार्त जोरदार पावसास सुरूवात झाली. २७ आॅगस्ट रोजी ४१ मिमी सरासरीची नोंद करण्यात आली. दरम्यानच्या दोन दिवसांत हलका पाऊस झाला. ३० आॅगस्ट रोजी पूर्वा नक्षत्राची सुरूवात संततधार पावसाने झाली. दिवसभर कोरडे वातावरण राहिल्यानंतर रात्री सुरू झालेला पावसाची सकाळी ३७.४० मिमी नोंद झाली. ३१ आॅगस्ट रोजी दिवसरात्र संततधार होती. पहिल्यांदाच २४ तासांत ५७ मिमी असा सर्वाधिक पाऊस झाला. कळमनुरी, सेनगाव तालुक्यांनी साडेतीनशे मिमीचा टप्पा ओलांडला.
अद्यापही हिंगोली तालुका पाऊणेतीनशे मिमीवर असताना औंढा ४५६ मिमीवर पोहोचला. मागील दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. सोमवारी दिवसभर रिमझिम सुरूच होती. अधूनमधून सळाके आले. अधिक पाणी झाल्याने नद्या, नाले, ओढे दुथडी भरले. सर्वच नद्यांना पाणी आले. वहिरीची पाणीपातळी झपाट्याने वाढली. कयाधूला पाणी आले. समतल भागात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली.