‘स्वाईन फ्लू’ च्या रुग्णांत वाढ
By Admin | Published: March 2, 2015 12:43 AM2015-03-02T00:43:05+5:302015-03-02T00:52:44+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे थैमान सुरु आहे़ ३० स्वाईन फ्लू संशयित रुग्ण, तर स्वाईन फ्लूची बाधा झालेल्या ७ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत़
लातूर : लातूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे थैमान सुरु आहे़ ३० स्वाईन फ्लू संशयित रुग्ण, तर स्वाईन फ्लूची बाधा झालेल्या ७ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत़ यामधील ३ रुग्णांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे़
लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस स्वाईन फ्लूच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ मागील दोन दिवसापासून वातावरणात बदल झाल्यामुळे सर्दी, खोकला, घशात खवखव, तापाचे रुग्ण वाढले आहेत़ लातूर येथील सर्वोपचार रुग्णालातील स्वाईन फ्लू कक्षात २२ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे़ यातील ३ रुग्ण पॉझिटीव्ह आहेत तर १९ संशयित रुग्ण आहेत़ ३ रुग्णांची प्रकृती उपचारा दरम्यान जास्तच खालावली असल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे़ लातूर शहरातील खासगी रुग्णालायत ४ रुग्ण उपचार घेत आहेत़ यातील ३ रुग्णांना स्वाईन फ्लूची बाधा झाली आहे़ १ स्वाईन फ्लू संशयित रुग्णावर उपचार करण्यत येत आहे़ उदगीर उपजिल्हा रुग्णालयातील स्वाईन फ्लू कक्षात ८ रूग्णावर उपचार करण्यात येत आहेत़ त्यात १ रुग्ण स्वाईन फ्लू पॉझिटीव्ह आहे़ ७ स्वाईन फ्लू संशयित रुग्णावर उपचार करण्यात येत आहेत़ निलंगा उपजिल्हा रूग्णालयातील स्वाईन फ्लू कक्षात ३ संशयित रुग्णांवर उपचार कारण्यात येत आहे़ जिल्ह्यात स्वाईन फ्लू संशयित तसेच बाधीत असे ३७ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत़ लातूर जिल्ह्यात मागील दोन महिन्यात स्वाईन फ्लूने ९ जणांचा बळी घेतला आहे़ (प्रतिनिधी)