वडवणी तालुक्यात सर्दी, तापीच्या रुग्णात वाढ

By Admin | Published: September 13, 2014 10:55 PM2014-09-13T22:55:48+5:302014-09-13T23:13:12+5:30

वडवणी : सध्या हवामान बदलामुळे व गावागावात पसरलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांना विविध साथीचे आजार जडू लागले आहेत़ दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ होत चालली असून

Increases in cold and tapiocular patients in the Wadvani taluka | वडवणी तालुक्यात सर्दी, तापीच्या रुग्णात वाढ

वडवणी तालुक्यात सर्दी, तापीच्या रुग्णात वाढ

googlenewsNext


वडवणी : सध्या हवामान बदलामुळे व गावागावात पसरलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांना विविध साथीचे आजार जडू लागले आहेत़ दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ होत चालली असून आरोग्य विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष असल्याचा अरोप होत आहे़
तालुक्यातील चिंचोटी, बाहेगव्हाण, मामला, चिंचाळा, पिंपरखेड, कुप्पा, हरिश्चंद्र पिंपरी, साळींबा, देवडी, तिगाव, पुसरा, मोरवड, चिंचवण, कान्हापूर, लखमापूर आदी गावांमध्ये सध्या साथ रोगांचे थैमान सुरू आहे़ सध्या वातावरणातही बदल असल्याचे दिसून येत आहे़ वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला हे आजार जडू लागले आहेत़ तसेच वेळेच्या वेळी ग्रामपंचायतीकडून स्वच्छता केली जात नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ यामुळे डासांची उत्पत्ती होऊन रहिवाशांना मलेरिया, चिकुनगुनिया, ताप, टाइफाईड यासारखे विविध साथीचे आजार जडू लागले आहेत़ आजारांना नागरिक वैतागून गेले आहेत़
साथ रोगांनी थैमान घातले असतानाही आरोग्य विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे़ कुठल्याही गावात जाऊन साधी धूरफवारणीची तसदीही आरोग्य विभाग घेत नसल्याने संताप व्यक्त होत आहे़ वडवणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व चिंचवणच्या आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांना योग्य सोयीसुविधा मिळत नसल्याने ते खाजगी रुग्णायांचा आधार घेत आहे़ खाजगी डॉक्टर रुग्णांची आर्थिक लूट करीत आहेत़ त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत़
आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर वेळेवर हजर राहत नसल्याने रुग्णांना ताटकळत बसण्याची वेळ येत आहे़ अनेक वेळा रुग्ण वैतागून रुग्णालयातून निघून गेल्याचे प्रकारही घडले आहेत़
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ एल़ आऱ तांदळे म्हणाले, वडवणी व कुप्पा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत आरोग्य सेवक, सेविका यांना मुख्यालयी थांबून आरोग्य सेवा पुरविण्याबाबत लेखी व तोंडी सूचना दिल्या आहेत़ सूचनांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल़ (वार्ताहर)

Web Title: Increases in cold and tapiocular patients in the Wadvani taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.