राष्ट्रवादी काँग्रेसच्या औरंगाबाद शहराध्यक्षांबद्दल वाढत्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 07:20 PM2020-03-07T19:20:05+5:302020-03-07T19:21:26+5:30

विजय साळवे हे पूर्वाश्रमीचे भाजपचे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची फारच लवकर महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली

Increasing complaints about NCP's Aurangabad city chief | राष्ट्रवादी काँग्रेसच्या औरंगाबाद शहराध्यक्षांबद्दल वाढत्या तक्रारी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या औरंगाबाद शहराध्यक्षांबद्दल वाढत्या तक्रारी

googlenewsNext
ठळक मुद्देशहराध्यक्षांच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह पदाधिकाऱ्यांबाबत कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय साळवे यांच्या कार्यशैलीबद्दल अनेक कार्यकर्ते प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असून, त्यांच्याबद्दलच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

काशीनाथ कोकाटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विजय साळवे हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बनले. यातून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष मराठ्यांचा पक्ष, ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न झाला. विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्षाचे एक नेते कदीर मौलाना यांच्या आग्रहामुळे विजय साळवे यांची ही नियुक्ती झाली. कार्याध्यक्ष म्हणून अभिषेक देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली व दलित-मराठा, असे संतुलन साधण्यात आले. 

विजय साळवे हे पूर्वाश्रमीचे भाजपचे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची फारच लवकर महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली, त्यावेळी प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यांची नियुक्ती झाल्यापासून विशेषत: जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तिखट प्रतिक्रिया उमटली व त्यांचे राष्ट्रवादी भवनात जाणे कमी झाले. मध्यंतरी राज्याचे अल्संख्याकमंत्री नवाब मलिक हे आले असताना त्यांच्यासमोरच राष्ट्रवादी भवनात माजी शहराध्यक्ष मुश्ताक अहमद यांनी तक्रारींचा पाढा वाचला होता. आम्हाला मान नसेल, तर आम्ही राष्ट्रवादी भवनात का यावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. 

शुक्रवारी मुश्ताक अहमद म्हणाले, विजय साळवे यांना बदलले पाहिजे, अशी मागणी आम्ही वरपर्यंत अगदी शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत केली आहे. आजही आम्ही या मागणीवर ठाम आहोत व शहराला लवकरात लवकर मुस्लिम शहराध्यक्ष देऊन न्याय दिला पाहिजे. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व निष्ठावंत कार्यकर्ते मोतीलाल जगताप म्हणाले, शहराध्यक्ष हे जबाबदारीचे पद असून, विद्यमान अध्यक्ष हे त्याचे भान ठेवून काम करतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. मनपा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सातत्याने राष्ट्रवादी भवनात बैठका, कार्यक्रम होत असतात. इच्छुक उमेदवार, त्यांचे समर्थक यांच्यामुळे राष्ट्रवादी भवनात गर्दी वाढू लागली आहे; परंतु मारहाणीसारखे प्रकार घडत असतील, तर आमच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांवरची नाराजी वाढत चालली आहे.
 

Web Title: Increasing complaints about NCP's Aurangabad city chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.