आॅनलाईन खरेदीत वाढ

By Admin | Published: May 20, 2017 12:38 AM2017-05-20T00:38:28+5:302017-05-20T00:39:05+5:30

बीड : इंटरनेट व अँड्रॉईड मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांचा आॅनलाईन खरेदीवर भर आहे.

Increasing online shopping | आॅनलाईन खरेदीत वाढ

आॅनलाईन खरेदीत वाढ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : इंटरनेट व अँड्रॉईड मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांचा आॅनलाईन खरेदीवर भर आहे. ‘कॅश आॅन डिलिव्हरी’ व घरपोच सेवेने ग्राहकांना आकर्षित केले असून शहरात १५ टक्के ग्राहक अगदी सूट- बुटापासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तंूची खरेदी आॅनलाईन करत आहेत. यातून महिन्याकाठी लाखोंची उलाढाल होत असल्याचे ‘लोकमत’ने शुक्रवारी केलेल्या पाहणीत समोर आले.
शहरात कुरिअर सेवा देणाऱ्या ६ संस्था आहेत. इंटरनेटवर आवश्यक ती वस्तू सर्च करुन खरेदीची आॅर्डर दिल्यानंतर चार दिवसांत ती घरपोच येते. वस्तू हातात पडल्यानंतर पैसे द्यावयाचे असल्याने ग्राहकांसाठी ते सोयीचे आहे. वस्तू पसंत नसल्यास ती परत करण्याचा अधिकारही ग्राहकांना आहे. स्थानिक व्यापारी ही सुविधा देत नाहीत. त्यामुळे आॅनलाईन वस्तू विक्री करणाऱ्या कंपन्यांची तरूणाईला भुरळ पडली आहे.

Web Title: Increasing online shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.