गुलमंडीवर आठ वर्षाच्या मुलीसोबत अश्लील कृत्य; वडिलांनी जाब विचारताच जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 01:35 PM2024-09-16T13:35:57+5:302024-09-16T13:36:09+5:30

सिटी चौक ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Indecent act with eight-year-old girl at Gulmandi; The father threatened to kill him as soon as he asked for an answer | गुलमंडीवर आठ वर्षाच्या मुलीसोबत अश्लील कृत्य; वडिलांनी जाब विचारताच जीवे मारण्याची धमकी

गुलमंडीवर आठ वर्षाच्या मुलीसोबत अश्लील कृत्य; वडिलांनी जाब विचारताच जीवे मारण्याची धमकी

छत्रपती संभाजीनगर : गुलंमडी परिसरातील एका मिठाईच्या दुकानासमोर आठ वर्षीय चिमुकली उभी असताना एका अनोळखी तरुणाने जवळ येत तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. त्याविषयी चिमुकलीच्या वडिलांनी जाब विचारताच आरोपसह त्याच्या साथीदाराने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार १३ सप्टेंबरला सायंकाळी ९ वाजता घडला. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यातंर्गत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सिटी चौक पोलिस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आठ वर्षीय चिमुकली आई-वडिलांसोबत गुलमंडी परिसरात आली होती. एका मिठाईच्या दुकानासमोर अनोळखी तरुणाने तिच्यासोबत अश्लील प्रकार केला. त्यामुळे चिमुकली प्रचंड घाबरली. हे पाहून तिच्या वडिलांनी अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणास याविषयी जाब विचारला तेव्हा त्याने मला लहान मुली आवडतात, असे प्रत्युत्तर दिले. त्यावर चिमुकलीच्या वडिलाने माझ्या मुलीला हात कसा लावलास, असा जाब विचारला तेव्हा त्याठिकाणी दुसरा अनोळखी तरुण आला. त्याने मी दादा आहे इथला. तू मला ओळखत नाहीस का, असे बाेलून मुलीच्या वडिलास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दाम्पत्याने सिटी चौक पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यावरून दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

दोन आरोपी अटकेत
सिटी चौक पोलिसांनी संतोष मगरे व सचिन साबळे (रा. जयभीमनगर, टाऊन हॉल) या दोघांना अटक केल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मनिषा हिवराळे यांनी दिली. या आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title: Indecent act with eight-year-old girl at Gulmandi; The father threatened to kill him as soon as he asked for an answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.