मराठवाडा मुक्ती दिनापासून ओबीसींचा बेमुदत सत्याग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:02 AM2021-09-16T04:02:12+5:302021-09-16T04:02:12+5:30
आरक्षण हक्क संवर्धन समितीच्या वतीने १७ सप्टेंबरला दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होणाऱ्या सत्याग्रहात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ते, एक दिवस ...
आरक्षण हक्क संवर्धन समितीच्या वतीने १७ सप्टेंबरला दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होणाऱ्या सत्याग्रहात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ते, एक दिवस याप्रमाणे बेमुदत सत्याग्रह करणार आहेत.
पदोन्नतीतील आरक्षण, ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण, महाराष्ट्र शासन आदिवासी विभागाने न्यायमूर्ती पी. व्ही. हरिदास यांच्या अहवालाचा चुकीचा अर्थ काढून ७ जूनला काढलेल्या परिपत्रकातील जाचक अटी रद्द कराव्यात,
ओबीसी व व्हीजेएनटी वर्गातील लोकांना एमपीएससीतील जागांचे समांतर आरक्षण देण्यात यावे या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या तयारीसाठी आरक्षण हक्क संवर्धन समितीचे प्रदेश अध्यक्ष पांडुरंग कवाने यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत के. ई. हरदास, रमेशभाई खंडागळे, कॉ. भास्कर लहाने, कॉ. प्रकाश पाटील, प्रेमसिंग चव्हाण, नारायण कुमावत, ज्ञानेश्वर खंदारे, श्याम निलंगेकर यांची उपस्थिती होती.