औरंगाबादेत भारत बंदला संमिश्र प्रतिसाद; विविध संघटनांचा बंदला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 01:22 PM2020-12-08T13:22:47+5:302020-12-08T13:34:34+5:30

Bharat Bandha , Agriculture Bills केंद्रीय किसान समन्वय समिती व जिल्ह्यातील कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीतर्फे मंगळवारी सकाळी ११.३० वाजता दिल्ली गेट येथे रास्ता रोको करण्यात आला.

India Bandha in Aurangabad Composite response; Bandha support of various organizations | औरंगाबादेत भारत बंदला संमिश्र प्रतिसाद; विविध संघटनांचा बंदला पाठिंबा

औरंगाबादेत भारत बंदला संमिश्र प्रतिसाद; विविध संघटनांचा बंदला पाठिंबा

googlenewsNext
ठळक मुद्देसरकारी कर्मचारी, व्यापारी, कामगार संघटना सामील

औरंगाबाद: केंद्रीय कृषी कायदे रद्द  करण्याच्या  मागणीसाठी  दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिलेल्या आजच्या भारत बंदच्या हाकेला औरंगाबादेत संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. शेतकरी बहुल भागात उत्स्फूर्त बंद पाळला गेला आहे. आयुक्तलय आणि जिल्हाधिकारी कार्यलयावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक चौकात पोलीस आहेत. 

शहरातील जाधववाडीत पालेभाज्या आडत बाजार बंद आहे. पण काही शेतकऱ्यांनी भाज्या विक्रीला आणल्या आहेत. मध्यवर्ती बसस्थानकामध्ये तुरळक गर्दी दिसून आली. सिडको, हडको, रोशनगेट, शहागज, सराफा बाजार, मछली खडक, गुलमंडी, औरंगपुरा, पैठणगेट येथे काही दुकाने सुरू असल्याचे दिसून आली.  बाजारपेठ नियमित सुरू आहेत. बहुतांश राजकीय  पक्ष, सामाजिक संघटना, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसह उद्योगातील कामगार, व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला.

केंद्रीय किसान समन्वय समिती व जिल्ह्यातील कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीतर्फे मंगळवारी सकाळी ११.३० वाजता दिल्ली गेट येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पोलीस आणि आंदोलक समोरसमोर आले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. या समितीतीत अखिल भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वराज अभियान, आम आदमी पार्टी,मार्क्सवादी कम्युनिस्ट, आयटक, सीटू, श्रमिक मुक्तीदल, हिंद मजदूर सभा, व्हिडीओकाॅन ग्रुप एम्पाॅईज युनियन, भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना, शहीद भगतसिंग हाॅकर्स युनियनचा सहभाग आहे.  

आज सकाळी १० ते ५ पर्यंत रिक्षा बंद
भारत बंद अंतर्गत ८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत औरंगाबाद शहरातील रिक्षा बंद राहतील, असे ऐक्टू प्रणीत लालबावटा रिक्षाचालक कामगार युनियन व संयुक्त रिक्षाचालक कृती समितीने जाहीर केले आहे. कॉम्रेड बुद्धिनाथ बराळ व निसार अहमद यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

बँक संघटनांचा पाठिंबा
बंदला ऑल इंडिया बँक एम्पॉईज असोसिएशनने पाठिंबा दर्शविला आहे. असोसिएशनचे देशभरातील ४ लाखांपेक्षा अधिक सभासद बिल्ला परिधान करून काम करतील.  यादिवशी होणाऱ्या निदर्शने, धरणे, मोर्चात बँक कर्मचारी सहभागी होतील. शेतकऱ्यांना बळ देणे, ही बँक संघटनेची भूमिका असल्याचे संघटनेचेे जनरल सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर यांनी निवेदनाद्वारे सांगितले.

‘बुलंद छावा’चा पाठिंबा
 बुलंद छावा मराठा युवा संघटनेने बंदला पाठिंबा दिला आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष मनोज गायके पाटील आणि सुरेश वाकडे यांनी ही माहिती कळविली. 

भूवैज्ञानिकांचा पाठिंबा 
जिऑलाॅजीकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या भूवैज्ञानिकांच्या संघटनेचे पदाधिकारीही दिल्लीकडे रवाना होणार आहेत, असे जिल्हाध्यक्ष कुणाल राऊत यांनी कळविले आहे. 

‘माफदा’चा पाठिंबा 
महाराष्ट्र फर्टीलायझर पेस्टीसाईड  सीड्स डिलर्स असोसिएशनने (माफदा) मंगळवारी विक्री बंद ठेवण्याचे आवाहन राज्यातील खते, औषधी, बियाणे विक्रेत्यांना करण्यात केले आहे. राज्याध्यक्ष जगन्नाथ काळे,  प्रकाश मुथा, विपिन कासलीवाल यांनी  कळवले आहे.  

मराठा क्रांती मोर्चा
भारत बंदमध्ये मराठा क्रांती मोर्चा सहभागी होणार असल्याचे पत्रक जारी केले. या पत्रकावर प्रा. चंद्रकांत भराट, किशोर चव्हाण, डॉ. शिवानंद भानुसे, मनोज गायके, प्रदीप हार्दे, रमेश गायकवाड, ॲड. रेखा वाहटुळे, रेणुका सोमवंशी  आदींची नावे आहेत.

ऑल इंडिया लॉयर्स युनियन
ऑल इंडिया लॉयर्स युनियनने बंदला पाठिंबा दर्शविला आहे. याला केंद्र शासन जबाबदार आहे, असे ऑल इंडिया लॉयर्स युनियनच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब वावळकर आणि सचिव चंद्रकांत भोजगर यांनी म्हटले आहे.

बंदच्या पार्श्वभूमीवर एसटीची खबरदारी
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर व जिल्ह्यात प्रवाशांचा प्रतिसाद पाहून एसटी आपल्या बसगाड्या सोडणार असल्याची माहिती एसटीचे विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.  तसेच औरंगाबाद येथील मध्यवर्ती, सिडको बसस्थानक, ग्रामीण भागातील आगाराच्या सुरक्षेसाठी संबंधित पोलीस ठाण्यांना कळविल्याचेही अरुण सिया यांनी सांगितले.

Web Title: India Bandha in Aurangabad Composite response; Bandha support of various organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.