इंडियन जिम्नॅस्टिक लीगमध्ये औरंगाबादच्या रिद्धी, सिद्धी उमटवणार ठसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 10:56 PM2017-11-29T22:56:11+5:302017-11-29T22:56:39+5:30
: औरंगाबादच्या प्रतिभावान खेळाडू रिद्धी आणि सिद्दी हत्तेकर या दोन उदयोेन्मुख खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपला विशेष ठसा उमटवला आहे. आता हे दोन्ही खेळाडू भारतात प्रथमच होणाºया ‘इंडियन जिम्नॅस्टिक लीग’मध्येही आपले कौशल्य सादर करणार आहेत.
औरंगाबाद : औरंगाबादच्या प्रतिभावान खेळाडू रिद्धी आणि सिद्दी हत्तेकर या दोन उदयोेन्मुख खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपला विशेष ठसा उमटवला आहे. आता हे दोन्ही खेळाडू भारतात प्रथमच होणाºया ‘इंडियन जिम्नॅस्टिक लीग’मध्येही आपले कौशल्य सादर करणार आहेत.
एमएसएम आणि साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात सराव करणाºया रिद्धी आणि सिद्धी प्रवीण हत्तेकर या जुळ्या बहिणी १ ते ३ डिसेंबर मुंबई येथे होणाºया इंडियन जिम्नॅस्टिक लीगमध्ये त्यांची निवड झाली आहे. या लीगसाठी निवड होणाºया या दोन्ही खेळाडू मराठवाड्याच्या पहिल्याच जिम्नॅस्ट ठरल्या आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल आणि भारतीय नौदलाच्या खेळाडूंचा प्रामुख्याने सहभाग राहणार आहे. चार संघांमध्ये होणाºया या स्पर्धेत रिद्धी ही टिष्ट्वस्टर्स, तर सिद्धी ही स्विंगर्स संघांमधून ज्युनिअर गटात प्रतिनिधित्व करणार आहे. सध्या त्या रामकृष्ण लोखंडे, तनुजा गाढवे, वीरेंद्र भांडारकर यांच्या निगराणीत सराव करीत आहेत. बॅलेन्स बीम, टम्बलिंग, रोमन रिंग, वॉल्ट, अनइव्हन बार, हाय बार, बॅलेन्स बीम आदी प्रकारच्या अप्रॅटसवर ही स्पर्धा होणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात औरंगाबादेत झालेल्या राज्य जिम्नॅस्टिक स्पर्धेत त्यांनी आपली पताका उंच धरत पदकांची कमाई केली होती. ज्युनिअर गटाच्या आपल्या कामगिरीचा झंझावात कायम ठेवत त्यांनी कोलकाता येथे झालेल्या राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेतही त्यांनी रौप्यपदक जिंकत यश मिळवले होते. या कामगिरीच्या जोरावर त्यांची जिम्नॅस्टिक स्पर्धेत आपली जागा पक्की केली.
लीगसाठी सुरू आहे कसून सराव
रिद्धी आणि सिद्धी हत्तेकर या भगिनी औरंगाबादच्या जिम्नॅस्टिक खेळात कायमच जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर पदके जिंकली आहेत. फ्लोअर आणि बीम एक्सरसाइजवर या भगिनींची चांगली पकड असून, हे अपॅरटस त्यांच्या जमेची बाजू आहेत. दिवसाच्या सुरुवातील आणि सूर्यास्ताला किमान पाच ते सहा तास सराव त्या करीत आहेत.
आगामी वर्षांत रिद्धी, सिद्धी भारताचे प्रतिनिधित्व करतील
रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणी तब्बल आठ ते दहा वर्षांपासून जिम्नॅस्टिकमध्ये सराव करीत आहेत. शरीराची तयारी व मूलभूत कौशल्य तांत्रिकदृष्ट्या जेवढे अचूक करण्यावर लक्ष द्याल तेवढी कामगिरी उंचावते आणि या दोघींच्या बाबतीतही हेच घडत आहे. आता त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ त्यांना मिळत आहे आणि आता चांगले प्रशिक्षकही मिळत आहेत. आगामी दोन ते तीन वर्षांत त्या भारतीय संघात स्थान मिळवतील, असा विश्वास वाटतो, अशी प्रतिक्रिया शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त, आंतरराष्ट्रीय पंच आणि प्रशिक्षक डॉ. मकरंद जोशी यांनी व्यक्त केली.