आशियाई स्पर्धेसाठी भारतीय तलवारबाजी संघ रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 11:51 PM2018-02-26T23:51:02+5:302018-02-26T23:51:20+5:30
दुबई येथे २५ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान होणाºया कॅडेट व ज्युनिअर गटाच्या आशियाई ज्युनिअर तलवारबाजी स्पर्धेसाठी भारताचा संघ नुकताच रवाना झाला आहे. या संघात औरंगाबादचा अभय शिंदे, नागपूरची हर्षदा दमकोंडवार आणि सांगलीचा आदित्य अंगल या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश आहे.
औरंगाबाद : दुबई येथे २५ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान होणाºया कॅडेट व ज्युनिअर गटाच्या आशियाई ज्युनिअर तलवारबाजी स्पर्धेसाठी भारताचा संघ नुकताच रवाना झाला आहे. या संघात औरंगाबादचा अभय शिंदे, नागपूरची हर्षदा दमकोंडवार आणि सांगलीचा आदित्य अंगल या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश आहे. या संघासोबत औरंगाबाद येथील साई केंद्रातील तुकाराम मेहेत्रे हे प्रशिक्षक म्हणून रवाना झाले आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे सराव शिबीर साईच्या केंद्रात झाले. या संघाला भारतीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष राजीव मेहता, सचिव बशीर खान, खजिनदार अशोक दुधारे, सहसचिव डॉ. उदय डोंगरे, साई केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रकाश काटुळे, खजिनदार राजकुमार सोमवंशी, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दयानंद कांबळे, क्रीडा अधिकारी गोकु ळ तांदळे, चंद्रशेखर घुगे, छाया पानसे, संजय भूमकर, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, सागर मगरे आदींनी शुभेच्छा दिल्या.