आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय व्हीलचेअर बास्केटबॉल संघाचे औरंगाबादेत शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:24 AM2018-02-19T00:24:19+5:302018-02-19T00:24:54+5:30

: बँकॉक येथे २ ते ११ मार्चदरम्यान होणाºया आशियाई पात्रता स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष आणि महिला व्हीलचेअर बास्केटबॉल संघाचे शिबीर औरंगाबादेतील ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रात आजपासून सुरू झाले आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारताचा महिला व पुरुषांचा व्हीलचेअर बास्केटबॉल संघ सहभागी होणार आहे.

Indian Wheelchair Basketball Team's Aurangabad Camp for International Competition | आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय व्हीलचेअर बास्केटबॉल संघाचे औरंगाबादेत शिबीर

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय व्हीलचेअर बास्केटबॉल संघाचे औरंगाबादेत शिबीर

googlenewsNext

औरंगाबाद : बँकॉक येथे २ ते ११ मार्चदरम्यान होणाºया आशियाई पात्रता स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष आणि महिला व्हीलचेअर बास्केटबॉल संघाचे शिबीर औरंगाबादेतील ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रात आजपासून सुरू झाले आहे.
 विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारताचा महिला व पुरुषांचा व्हीलचेअर बास्केटबॉल संघ सहभागी होणार आहे. महासंघाच्या सचिव कल्याणी राजाराम यांना संघ सर्वोत्तम कामगिरी करील, असा विश्वास आहे.
औरंगाबादेत होणाºया भारतीय संघाच्या शिबिरात सहभागी असणारे खेळाडू (महिला) : कार्तिकी पटेल (कर्णधार), रेखा, व्हिनोलिया लॉरेन्स, एच. अलयामिनी, हिमा बांदी, मारी लक्ष्मी, सत्यवती पंडरंकी, मनीषा पाटील, गीता चौहान, अल्फोन्सा थॉमस, सुचिता परिदा, मीनाक्षी जाधव. प्रशिक्षक : ली रॉय सिमन, फिजियो थेरेपीस्ट : अंबरीश. पुरुष संघ : प्रेम आले (कर्णधार), पार्थसारथी वेंकटरामन, मोहमद लतीफ टी., जगन्नाथन डी. अजित कुमार शुक्ला, वरुण कारखानीस, कुप्पी रेड्डी, सुरेश कार्की, रमेश शनमुंघम, आरुल विल्सन, मोहमद फहिम, प्रेम पटवाल. प्रशिक्षक टी. सुब्रण्यम.

Web Title: Indian Wheelchair Basketball Team's Aurangabad Camp for International Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.