कृषी विभागाकडून मिळणार कपाशीच्या देशी वनाचे बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:04 AM2021-05-23T04:04:42+5:302021-05-23T04:04:42+5:30
महा डी.बी.टी पोर्टलवर खरिप बियाण्यांच्या नोंदणीसाठी सोयाबीन, तूर. मूग, बाजरी, भात, उडीद, मका या सोबतच आता देशी कपाशीच्या बियाण्यांसाठीही ...
महा डी.बी.टी पोर्टलवर खरिप बियाण्यांच्या नोंदणीसाठी सोयाबीन, तूर. मूग, बाजरी, भात, उडीद, मका या सोबतच आता देशी कपाशीच्या बियाण्यांसाठीही नोंदणी करता येणार असून, देशी वाणाच्या कपाशीचे बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पोर्टलच्या नोंदणीसाठी जिल्हा कृषी विभागाने आता मुदतवाढ दिली आहे. यात कपाशीच्या बियाण्यांचाही समावेश करण्यात आला आहे; मात्र पन्नास एकरसाठी हा प्रकल्प राबवियात येत असल्याचे कृषी विभागाने सांगितले. लांब धाग्याच्या कापूस उत्पादनात अग्रेसर असलेल्या सोयगाव तालुक्यातील जरंडी, निंबायती, माळेगाव, पिंपरी, कंकराळा, धिंगापूर आणि रावेरी या सहा गावांसाठी महा डी.बी.टी पोर्टल वर देशी वाणाच्या कपाशीच्या बियाण्यांची नोंदणी करता येणार असून या सहा गावांनाच हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हाभर केवळ सोयगाव तालुक्यातील या गावांना देशी वाणाच्या कपाशीचे बियाणे अनुदानावर मिळणार आहे. त्यामुळे सोयगाव परिसरात आता लांब धाग्याच्या कपाशीचे उत्पन्न वाढणार आहे.