दोन महिन्यांनंतर इंडिगोच्या दिल्ली विमानसेवेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:05 AM2021-07-07T04:05:11+5:302021-07-07T04:05:11+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर तात्पुरती रद्द केलेली इंडिगोची दिल्लीची विमानसेवा दोन महिन्यांनंतर सोमवारी पुन्हा एकदा ...
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर तात्पुरती रद्द केलेली इंडिगोची दिल्लीची विमानसेवा दोन महिन्यांनंतर सोमवारी पुन्हा एकदा सुरू झाली. पहिल्याच दिवशी या विमानसेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.
दिल्ली-औरंगाबाद विमानाने १०४ प्रवासी दाखल झाले, तर औरंगाबादहून ११७ प्रवासी दिल्लीला रवाना झाले, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली. पहिल्याच दिवशी दिल्लीच्या विमानाला मिळालेल्या प्रतिसादावरून या विमानसेवेची गरज स्पष्ट झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रवासी संख्येत घट झाली. त्यामुळे इंडिगोने औरंगाबादहून सुरू असलेली सर्व विमाने तात्पुरती रद्द केली होती; परंतु आता औरंगाबादची हवाई सेवा पूर्वपदावर येत आहे.
आजपासून हैदराबाद विमान
६ जुलैपासून हैदराबाद विमानसेवाही सुरू होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तात्पुरती बंद केलेली इंडिगोची मुंबई-औरंगाबाद आणि औरंगाबाद-मुंबई ही विमानसेवादेखील १२ जुलैपासून पुन्हा सुरू होत आहे. इंडिगोचे मुंबई विमान आठवड्यातून सोमवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी उड्डाण घेणार आहे.