इंडिगोचे दिल्ली, हैदराबाद विमान ५ जुलैपासून पुन्हा घेणार ‘उड्डाण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 01:04 PM2021-06-23T13:04:38+5:302021-06-23T13:05:41+5:30
इंडिगोकडून बंगळुरू आणि अहमदाबाद विमानसेवाही लवकरच सुरू केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे इंडिगोने औरंगाबादहून सुरू असलेली सर्व विमाने रद्द केली होती. दि. ५ जुलैपासून दिल्ली आणि हैदराबादची विमानसेवा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय इंडिगोने घेतला आहे. त्यामुळे औरंगाबादची हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा एकदा वाढणार आहे.
औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस आणि औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा आठवड्यातून चार दिवस राहणार आहे, अशी माहिती उद्योजक सुनीत कोठारी यांनी दिली. सध्या केवळ एअर इंडियाची विमानसेवा सुरू असून, त्याद्वारे मुंबई आणि दिल्लीला विमानसेवा उपलब्ध आहे. इंडिगोकडून बंगळुरू आणि अहमदाबाद विमानसेवाही लवकरच सुरू केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांची संख्या घटल्याने इंडिगोने विमानसेवा तात्पुरती रद्द केली होती. अखेर ही सेवा पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्यास सुरुवात झाली आहे.