सफाईसाठी लवकरच इंदौर पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:50 AM2017-12-20T00:50:31+5:302017-12-20T00:50:34+5:30
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये मागील वर्षी औरंगाबाद शहराचा क्रमांक २९९ वा आला होता. यंदाही जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात केंद्राचे एक पथक शहरातील साफसफाईचा आढावा घेण्यासाठी येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये मागील वर्षी औरंगाबाद शहराचा क्रमांक २९९ वा आला होता. यंदाही जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात केंद्राचे एक पथक शहरातील साफसफाईचा आढावा घेण्यासाठी येणार आहे. मागील वर्षी इंदौर शहराने देशभरात अव्वल क्रमांक मिळविला होता. त्याच धर्तीवर औरंगाबाद शहरातही साफसफाई करण्याचा मानस महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केला. प्रत्येक घरातून कचरा उचलण्यासाठी खाजगी एजन्सीची मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी सीएसआर फंड उभा करण्यात येईल.
शहरातील कचरा प्रश्नावर महापालिकेला लवकरात लवकर अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. नवी मुंबई महापालिकेने ज्या पद्धतीने वर्षानुवर्षे पडलेला कचरा नष्ट केला त्याच पद्धतीने नारेगाव येथील २० लाख टन कचरा नष्ट करण्याचा प्रयत्न मनपा करणार आहे. नारेगाव येथील शेतकºयांनी मनपाला फक्त तीन महिने कचरा टाकण्याची मुभा दिली आहे. ही मुदत आता संपत आल्याने मनपाला त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहे. पुन्हा शेतकºयांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले तर मनपाची भयंकर कोंडी होणार आहे. कचरा नष्ट करण्यासाठी एजन्सीचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान, महापौरांसह पदाधिकाºयांनी मंगळवारी उद्योगपती राम भोगले यांची भेट घेऊन शहरातील कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी काय करता येईल, याबाबत चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना महापौर म्हणाले की, भोगले यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. दोन दिवसांत महापालिका शहरातील कचºयावर प्रक्रिया करणे, वाहतूक, कचºयाचे डोअर टू डोअर कलेक्शन करणे यासाठी देशपातळीवरील इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविणार आहे. महापालिकेने यापूर्वी साफसफाईचे खासगीकरण करून रॅम्की कंपनीला नियुक्त केले होते. नगरसेवकांच्या वाढत्या तक्रारीनंतर कंपनीचे काम बंद करण्यात आले.
सीएसआर फंडसाठी बैठक; कचºयापासून खत व इंधन निर्मितीचा पर्याय
महापौर घोडेले, सभापती गजानन बारवाल, सभागृहनेते विकास जैन, नगरसेवक राजू वैद्य, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, शहर अभियंता एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता डी. पी. कुलकर्णी यांनी उद्योगपती भोगले यांची भेट घेतली. भोगले यांनी प्रत्येक वॉर्डात किंवा प्रभागात कचºयावर मशीनद्वारे प्रक्रिया करून ओल्या कचºयापासून खत व सुक्या कचºयापासून इंधननिर्मितीचा पर्याय मांडला.
दोन ते अडीच टन कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी सुमारे २५ लाखांचे मशीन उपलब्ध आहेत. त्यासाठी महापालिकेला पाणी, कर्मचारी व लाइटची व्यवस्था करावी लागेल. मशीन खरेदी करण्यासाठी विविध कंपन्यांचा सीएसआर फंड मिळविण्याचा प्रयत्न करू असे भोगले यांनी आश्वासन दिले. त्यासाठी दोन दिवसांत बैठक घेण्यात येईल, असे महापौरांनी नमूद केले.