औद्योगिक अभियांत्रिकी प्रदर्शन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:39 AM2017-11-11T00:39:26+5:302017-11-11T00:39:28+5:30

यवसाय, उद्योगातील नवीन तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या औद्योगिक आणि अभियांत्रिकी प्रदर्शनाचे उद्घाटन रेल्वेस्टेशन रोडवरील अयोध्यानगरी मैदानावर शुक्रवारी झाले

Industrial engineering exhibition | औद्योगिक अभियांत्रिकी प्रदर्शन सुरू

औद्योगिक अभियांत्रिकी प्रदर्शन सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : व्यवसाय, उद्योगातील नवीन तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या औद्योगिक आणि अभियांत्रिकी प्रदर्शनाचे उद्घाटन रेल्वेस्टेशन रोडवरील अयोध्यानगरी मैदानावर शुक्रवारी झाले. इंदोर येथील इन्फोलाइन, जैन इंजिनिअर्स सोसायटी आणि मराठवाडा आॅटो क्लस्टरच्या विद्यमाने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. रविवारी (दि.१२) पर्यंत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले असणार आहे.
तीनदिवसीय औद्यगिक व अभियांत्रिकी प्रदर्शनाचे उद्घाटन शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी संयोजक असलेले इन्फोलाइनचे संचालक आर. के. अग्रवाल, जैन इंजिनिअर्स सोसायटीचे अध्यक्ष आनंद मिश्रीकोटकर, सचिव दर्शन संचेती, रूपेश ठोळे, भरत गंगाखेडकर, दिनेश गंगवाल, मोतीलाल पाटणी, महावीर सेठी, नितीन बोरा, सुनील सेठी, राजेश पाटणी, कमल पहाडे, भरत जैन, सचिन सोनटक्के, पृथ्वीराज शहा, इंद्रजित शहा, राजेश लोढा, सुशील गंगवाल, शिरीष खंडारे, आनंद चोरडिया, संदीप भंडारी, सावन चुडीवाल आदी उपस्थित होते. इन्फोलाइनतर्फे यापूर्वी नागपूर, नाशिक, रायपूर, इंदोर, हैदराबाद, कोइमतूर, जमशेदपूर आदी ठिकाणी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. व्यावसायिकांना सकाळी ११ ते २ वाजेदरम्यान आणि नागरिकांसाठी सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन बघता येणार आहे. प्रदर्शनात १२५ पेक्षा अधिक प्रसिद्ध कंपन्या सहभागी झाल्या आहेत. यात इंडस्ट्रीयल आॅटोमेशन, मशीन टूल्स, बेअरिंग, स्विच गीअर्स, पंप वेल्डिंग उपकरणे, फार्मा मशिनरी, पावर टूल्स, कटिंग टूल्स, बांधकाम उपकरणे याच्यासह इतरही वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन संयोजक राजकुमार अग्रवाल यांनी केले आहे.

Web Title: Industrial engineering exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.