औद्योगिक क्षेत्रात सांडपाण्यामुळे उद्योजक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 10:26 PM2019-03-28T22:26:16+5:302019-03-28T22:26:27+5:30
वाळूज औद्योगिक क्षेत्रात अनेक कारखानदार कारखान्यातील सांडपाणी उघड्यावर सोडून देत आहेत. घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने याचा इतर उद्योजकांना त्रास सहन करावा लागत आहे.
वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रात अनेक कारखानदार कारखान्यातील सांडपाणी उघड्यावर सोडून देत आहेत. हे सांडपाणी वाहत जाऊन दुसऱ्या कारखान्यांसमोर साचत आहे. घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने याचा इतर उद्योजकांना त्रास सहन करावा लागत आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील के सेक्टरमधील प्लॉट नं. १२५ लगत मुख्य रस्त्यावरच सांडपाणी साचले आहे. या पाण्याच्या दुर्गंधीमुळे लगतच्या उद्योजक व काम करणाऱ्या कामगारांना काम करणे अवघड झाले असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसी प्रशासनो अशा कारखानदारावर कारवाई करुन उघड्यावर सांडपाणी सोडण्यास पायबंद घालावा, अशी मागणी त्रस्त उद्योजकांमधून होत आहे.