बालकाचा निर्र्घृण खून
By Admin | Published: May 3, 2016 12:56 AM2016-05-03T00:56:43+5:302016-05-03T01:04:54+5:30
जालना : जमिनीच्या लोभातून चुलत्यानेच पुतण्याचा निर्घृण खून केल्याची घटना रविवारी मंठा चौफुली परिसरात घडली. सक्षम मनोज जोडीवाले (३) असे मृत बालकाचे नाव आहे.
जालना : जमिनीच्या लोभातून चुलत्यानेच पुतण्याचा निर्घृण खून केल्याची घटना रविवारी मंठा चौफुली परिसरात घडली. सक्षम मनोज जोडीवाले (३) असे मृत बालकाचे नाव आहे. या प्रकरणी राखी जोडीवाले यांनी फिर्याद दिल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी जाफराबादेतून सातजणांना अटक केली.
सक्षम व त्याची आई राखी हे दोघेही रविवारी अहिर गवळी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी औरंगाबाद येथून जालन्यात आले होते. राखी यांचे सासर जाफाराबाद असून, तेथील मंडळीही या सोहळ्याला आली होती. दरम्यान, सोहळ्यातून सायंकाळी पाचच्या सुमारास बेपत्ता झाला. त्याचा सर्वत्र शोध घेतला पण तो आढळून आला नाही. त्यानंतर राखी जोडीवाले यांनी सदर बाजार पोलिसांत मुलगा हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनीही रात्रभर सक्षमचा शोध घेतला पण तो मिळाला नाही. सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास तालुका जालना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंठा चौफुली परिसरातील सिमेंट कम्पाउंडमध्ये सक्षमचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर परसिरातील रहिवाशांनी तालुका पोलिसांना याबाबतची माहिती दिली. तालुका जालना पोलीस आणि सदर बाजार पोलिसांचे पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. सक्षमच्या डोक्यात मोठा दगड घातल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
राखी जोडीवाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी रामेश्वर चुडामल जोडीवाले, मुकेश चुडामल जाडीवाले, श्रावण चुडामल जोडीवाले, सुरज हिरामन जोडीवाले, नितू रामेश्वर जोडीवाले, मुन्नीबाई चुडामल जोडीवाले (सर्व रा.जाफराबाद) यांना अटक केली आहे. तर हिराबाई गणेशलाल गोरक्षक फरार आहे.