वाळूज महानगरात आरोग्य विभागातर्फे साथरोग सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:05 AM2021-09-11T04:05:31+5:302021-09-11T04:05:31+5:30

:नागरिकात जनजागृती; स्वच्छता पाळण्याच्या सूचना : नागरिकांत जनजागृती; स्वच्छता पाळण्याच्या सूचना वाळूज महानगर : वाळूज महानगरात साथीच्या आजाराचा धोका ...

Infectious Diseases Survey by Health Department in Waluj | वाळूज महानगरात आरोग्य विभागातर्फे साथरोग सर्वेक्षण

वाळूज महानगरात आरोग्य विभागातर्फे साथरोग सर्वेक्षण

googlenewsNext

:नागरिकात जनजागृती; स्वच्छता पाळण्याच्या सूचना

: नागरिकांत जनजागृती; स्वच्छता पाळण्याच्या सूचना

वाळूज महानगर : वाळूज महानगरात साथीच्या आजाराचा धोका वाढल्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवारी (दि. १०) या परिसरात साथरोग सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी भेटी देऊन स्वच्छता पाळण्याविषयी नागरिकांत जनजागृती केली.

या परिसरात गत काही दिवसांपासून चिकुनगुनिया, डेंग्यू, मलेरिया साथीचे आजार बळावल्यामुळे नागरिकांत भीती होती. साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने विविध उपाययोजना कराव्यात, यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देऊन तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनंतर शुक्रवारी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत दाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. वाकदकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज महानगर परिसरात साथरोग सर्वेक्षण व जनजागृतीला सुरुवात केली. यावेळी आरोग्य पर्यवेक्षक डी. एस. गजभारे, आरोग्य सहायक राधेश्याम वैष्णव, आरोग्य सेवक शेख सिकंदर, राहुल कोठाळे, गट प्रवर्तक सुनीता गोरे आदींच्या पथकाने वडगाव, शरणापूर, धरमपूर, वंजारवाडी आदी ठिकाणी गृहभेटी देऊन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात कुटुंबातील सदस्यांना काही आजार असल्यास अथवा लक्षणे दिसून आल्यास उपचारासाठी लगतच्या आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी नागरिकांना ड्राय डे पाळणे, औषधी फवारणी करणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे तसेच आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

फोटो ओळ - वडगाव कोल्हाटी परिसरात आरोग्य विभागाच्या वतीने साथरोग सर्वेक्षणात गृहभेटी देऊन नागरिकांत स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.

फोटो क्रमांक- जनजागृती १/२/३

------------------

Web Title: Infectious Diseases Survey by Health Department in Waluj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.