पपईची निकृष्ट रोपे, कृषी विभागाकडे तक्रार नोंदवूनदेखील घेईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:04 AM2021-09-19T04:04:22+5:302021-09-19T04:04:22+5:30

चिंचोली लिंबाजी नेवपूर, गणेशपूर, बालखेड, टाकळी अंतुर येथील सुमारे २५ शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात बालाजी घोटे यांच्याकडून तैवान ७८६ (रेडलेडी) ...

Inferior papaya seedlings were not taken even after filing a complaint with the agriculture department | पपईची निकृष्ट रोपे, कृषी विभागाकडे तक्रार नोंदवूनदेखील घेईना

पपईची निकृष्ट रोपे, कृषी विभागाकडे तक्रार नोंदवूनदेखील घेईना

googlenewsNext

चिंचोली लिंबाजी नेवपूर, गणेशपूर, बालखेड, टाकळी अंतुर येथील सुमारे २५ शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात बालाजी घोटे यांच्याकडून तैवान ७८६ (रेडलेडी) या जातीचे पपईचे रोपे खरेदी केली होती. प्रती रोप १९ रुपये व लागवड प्रक्रियेसाठी ५ हजार रुपये शेतकऱ्यांनी अदा केली. मात्र, सुरुवातीपासून या रोपांची वाढ झाली नाही. कंपनीच्या प्रतिनिधीनेदेखील दुर्लक्ष केल्याने सर्व शेतकऱ्याने लाखो रुपये नुकसान झाले. याबाबत तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी विभाग कन्नड यांच्याकडे शेतकऱ्यांनी लेखी तक्रार नोंदवून कारवाईची मागणी केली. मात्र, २५ दिवसांपासून कृषी विभागाला येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीची साधी पाहणीदेखील करावीशी वाटत नाही, मग आम्ही दाद मागायची तरी कोणाकडे, असा प्रश्न नेवपूरचे शेतकरी नीलेश पाटील व चिंचोली येथील डॉ राजू पटेल या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

180921\20210827_110321.jpg

१)नेवपूर (ता.कन्नड )येथील शेतकऱ्यांच्या पपई पिकाची झालेली अवस्था झाली आहे

Web Title: Inferior papaya seedlings were not taken even after filing a complaint with the agriculture department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.