अमानुष ! ६ वर्षीय मुलीवर नात्यातीलच ५३ वर्षीय नराधामाचा घरात घुसून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 06:01 PM2017-10-26T18:01:08+5:302017-10-26T18:03:10+5:30

६ वर्षाच्या मुलीच्या घरात घसुन ५३ वर्षीय नात्यातील मौसा असलेल्या नराधमाने बलात्कार केल्याची घटना सातारा परिसरात घडली.

Inhuman! 53-year-old gang rape rape | अमानुष ! ६ वर्षीय मुलीवर नात्यातीलच ५३ वर्षीय नराधामाचा घरात घुसून बलात्कार

अमानुष ! ६ वर्षीय मुलीवर नात्यातीलच ५३ वर्षीय नराधामाचा घरात घुसून बलात्कार

googlenewsNext
ठळक मुद्देपिडीत मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधून आरोपी गणी पटेलने तिच्यावर बळजबरी केली. ही बाब कोणाला सांगू नये,यासाठी त्याने तिला धमकावले.

औरंगाबाद : ६ वर्षाच्या मुलीच्या घरात घसुन ५३ वर्षीय नात्यातील मौसा असलेल्या नराधमाने बलात्कार केल्याची घटना सातारा परिसरात घडली. १६ आॅक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी पीडितेच्या मातेने सातारा पोलीस ठाण्यात नराधामाविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. याप्रकणी आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

गणी पटेल (वय ५३,रा.सातारा परिसर)असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार यांची मुलगी १६आॅक्टोबर रोजी दुपारी २.१५ ते २.३० वाजेच्या सुमारास घरी होती. ती एकटी असल्याची संधी साधून आरोपी गणी पटेलने तिच्यावर बळजबरी केली. त्यानंतर ही बाब कोणाला सांगू नये,यासाठी त्याने तिला धमकावले. यावेळी तो पीडितेला कपडे घालण्यास मदत करीत असताना पीडितेची भावजयी तेथे गेली. यावेळी भावजयीने त्या आरोपीला हटकले असता त्याने तिलाही अश्लील शिवीगाळ करून लज्जास्पद वर्तन केले. 

या घटनेनंतर आरोपी तेथून निघून गेला. झालेल्या प्रकारामुळे नणंद-भावजयी प्रचंड घाबरून गेल्या. त्यांनी आठ दिवस ही बाब लपवून ठेवली. शेवटी त्यांनी झालेल्या प्रकाराची माहिती पिडीतेच्या मातेला दिली. यानंतर पिडीतेच्या मातेने शेवटी २५ सप्टेंबर रोजी आरोपीविरूद्ध सातारा ठाण्यात बाल लैगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये आणि बलात्कार करणे, विनयभंग केल्याचा गुन्हा नोंदविला. याबाबत पोलीस उपनिरीक्षक डोईफोडे तपास करीत असून आरोपीला अटक करण्यात आल आहे.

Web Title: Inhuman! 53-year-old gang rape rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस