‘शुभकल्याण’च्या फसवणूक झालेल्या बिडकीनमधील ठेवीदारांचे उपोषण सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:33 AM2017-12-19T00:33:45+5:302017-12-19T00:34:10+5:30

बिडकीन येथील शुभकल्याण मल्टिस्टेट को. आॅप सोसायटीच्या बिडकीन शाखेतील फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी सोमवारपासून कळंब येथील शंभू महादेव साखर कारखान्यासमोर उपोषण सुरु केले आहे.

 Initially, the depositors of the 'Shubhakalayan' cheated Bidyen started their fast | ‘शुभकल्याण’च्या फसवणूक झालेल्या बिडकीनमधील ठेवीदारांचे उपोषण सुरु

‘शुभकल्याण’च्या फसवणूक झालेल्या बिडकीनमधील ठेवीदारांचे उपोषण सुरु

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बिडकीन : येथील शुभकल्याण मल्टिस्टेट को. आॅप सोसायटीच्या बिडकीन शाखेतील फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी सोमवारपासून कळंब येथील शंभू महादेव साखर कारखान्यासमोर उपोषण सुरु केले आहे.
बिडकीन येथे प्रस्तावित डिएमआयसीमुळे अनेक राष्ट्रीयीकृत व सहकारी बँका,प् ातसंस्था, मल्टीस्टेट अशा अनेक शाखा बिडकीन येथे सुरु झाल्या आहेत. त्यातीलच हावरगाव ता. कळंब येथील शुभकल्याण मल्टीस्टेट को.आॅप.सोसायटीनेही आपली शाखा येथे सुरु करुन ठेवीदारांच्या ठेवी जमा केल्या. सदरील ठेवीदारांना सुरुवातीला व्याज वेळेवर मिळाले, परंतु नोव्हेंबर २०१६ पासून व्याज मिळणे बंद झाल्यामुळे तसेच सदरील मल्टीस्टेटचे संस्थापक व्याज व मुद्दल देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात येताच जवळपास १० ते १५ ठेवीदारांचे ४२ लाख रुपये शुभकल्याण मल्टीस्टेटमध्ये गुंतल्यामुळे ठेवीदार हवालदिल झाले आहेत. या सर्वांनी मिळून २१ जुलै २०१७ रोजी बिडकीन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. परंतु त्याचा अजून काहीही तपास न लागल्यामुळे वयोवृद्ध ठेवीदार बळवंत पिराजी सोकटकर, भुजंगराव लक्ष्मण कवडे, सुभाष रावसाहेब लंभाडे, राजू युवराज पाटील, संभाजी रावसाहेब लंभाडे, दिनेश धनराज बोरसे, मुरलीधर विठ्ठल वाघ, भीवसन मारुती शिंदे, प्रकाश मोहन धर्मे, केशव कारभारी पाबळे, भगवान जाधव, लक्ष्मण वारगुळे व कवडे तसेच सदरील मल्टिस्टेटचे व्यवस्थापक रवींद्र पावटेकर हेही सदरील मल्टीस्टेटच्या संस्थापक अध्यक्षांच्या साखर कारखान्यासमोर उपोषणास बसले आहेत. याबाबत त्यांनी चेअरमन शुभकल्याण मल्टीस्टेट हावरगाव, पोलीस निरीक्षक कळंब, पोलीस अधीक्षक उस्मानाबाद, जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद, पोलीस निरीक्षक बिडकीन, पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद, जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद व मुख्यमंत्र्यांना उपोषणास बसणार असल्याचे निवेदन दिले आहे. तसेच सोबत ठेवीदारांची यादी व संचालक मंडळाची यादीही जोडली आहे.
जास्त व्याजाच्या आमिषामुळे वृद्ध, गोरगरिबांची फसगत
शुभकल्याण मल्टीस्टेटमध्ये वयोवृद्ध व गोरगरिबांच्या ठेवी गुंतल्या असून जास्तीच्या व्याजाचे आमिष दाखवून त्यांना फसविण्यात आल्यामुळे बिडकीन व परिसरातील ठेवीदार हैराण झाले आहेत तर वयोवृद्ध बळवंत पिराजी सोकटकर म्हणाले की, माझे जवळपास दहा लाख व व्याज गुंतल्यामुळे व सतत पैशाच्या चिंतेत मला मधुमेह झाला आहे. माझ्या जीवितास काही झाले तर यास शुभकल्याण मल्टीस्टेटचे चेअरमन व संचालक मंडळ जबाबदार असल्याचे सांगितले. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांच्यावर उपोषणाची वेळ आल्यामुळे त्यांचे कुटुंबही चिंतेत पडले आहे.

Web Title:  Initially, the depositors of the 'Shubhakalayan' cheated Bidyen started their fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.