न्यूमोकोकल लसीकरणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:04 AM2021-07-15T04:04:51+5:302021-07-15T04:04:51+5:30
दरवर्षी न्यूमोनियामुळे मोठ्या प्रमाणात बालमृत्यू होतात. परिणामी बालमृत्यू रोखण्यासाठी बालकांना न्यूमोकोकल (पीसीव्ही) लस दिली जाणार आहे. लहान मुलांमध्ये ...
दरवर्षी न्यूमोनियामुळे मोठ्या प्रमाणात बालमृत्यू होतात. परिणामी बालमृत्यू रोखण्यासाठी बालकांना न्यूमोकोकल (पीसीव्ही) लस दिली जाणार आहे. लहान मुलांमध्ये न्यूमोकोकल न्यूमोनिया संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. दरवर्षी अनेक बालकांचा न्यूमोकोकलमुळे मृत्यू होतो. बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. न्यूमोनियापासून बालकांचे संरक्षण व्हावे यासाठी न्यूमोकोकल लसीकरण राबविण्यात येणार आहे. दरम्यान, लहान बालकांच्या नियमित लसीकरण कार्यक्रमाबरोबरच न्यूमोकोकल लसीकरण होणार आहे.
-
असे होणार लसीकरण
न्यूमोकोकल न्यूमोनिया हा श्वसनमार्गाला होणारा एक संसर्ग आहे. ज्यामुळे फुप्फुसावर सूज येऊन त्यात पाणी भरू शकते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. शरीरातील ऑक्सिजन कमी होऊ शकतो. बालकांना याचा धोका संभवतो. बालकांना न्यूमोकोकलचे तीन डोस दिले जाणार आहेत. दीड महिन्याचे झाल्यानंतर पहिला डोस, साडेतीन महिन्याचे झाल्यानंतर दुसरा, तर नऊ महिन्याचे झाल्यानंतर तिसरा बूस्टर डोस दिला जाणार आहे.