जखमी झालेल्या काळविटाचे वाचविले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:02 AM2021-04-18T04:02:06+5:302021-04-18T04:02:06+5:30
कन्नड : जखमी अवस्थेत काळवीट पडलेला असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर काळविटास मक्रणपूर येथील ...
कन्नड : जखमी अवस्थेत काळवीट पडलेला असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर काळविटास मक्रणपूर येथील रोपवाटिकेत आणून त्याच्यावर उपचार करण्यात आले. वनविभागाच्या सतर्कतेमुळे जखमी काळविटाला नवजीवन मिळाले.
शिवराई येथील भगवान घुगे यांच्या शेतात जखमी अवस्थेत काळवीट दिसून आले. यासंबंधी प्रादेशिक वनविभागाचे शीघ्र कृतीदलाचे सदस्य एस. एम. माळी व वनमजूर सय्यद यांना माहिती देण्यात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठले. जखमी काळविटास मक्रणपूर रोपवाटिकेत आणले. या काळविटावर लांडगा किंवा कुत्र्याचा हल्ला झाला असावा, असा अंदाज वनअधिकाऱ्यांचा आहे. त्याचे समोरचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झालेले होते. काळविटाला रोपवाटिकेपर्यंत आणेपर्यंत वनरक्षक एस.एम. शेख हे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. चव्हाण
यांना घेऊन आले. काळविटावर उपचार करून पायाला प्लास्टर केले गेले. सदर काळवीट देखरेखीखाली रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे.
फोटो : जखमी काळविटावर उपचार करताना वन्यकर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकारी.
170421\suresh ramrao chavan_img-20210417-wa0028_1.jpg