वैजापूर बाजार समितीच्या सभापतींवर शाई ‘हल्ला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:29 AM2017-12-05T00:29:05+5:302017-12-05T00:29:37+5:30

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासिक बैठकीत सोमवारी सकाळी शिवसेनेच्या नाराज संचालकांनी सभापती काकासाहेब रामकृष्ण पाटील यांच्यावर शाई हल्ला केला. त्यांच्या तोंडाला काळे फासून शेण समोर ठेवल्याच्या घटनेने बैठकीत चांगलाच गोंधळ उडाला.

Ink 'attack' on Vaizapur market committee chairman | वैजापूर बाजार समितीच्या सभापतींवर शाई ‘हल्ला’

वैजापूर बाजार समितीच्या सभापतींवर शाई ‘हल्ला’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासिक बैठकीत सोमवारी सकाळी शिवसेनेच्या नाराज संचालकांनी सभापती काकासाहेब रामकृष्ण पाटील यांच्यावर शाई हल्ला केला. त्यांच्या तोंडाला काळे फासून शेण समोर ठेवल्याच्या घटनेने बैठकीत चांगलाच गोंधळ उडाला. सभागृहातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढून सभागृहाचा भगवा रंग बदलल्याच्या कारणावरून हे राजकीय शीतयुद्ध रंगले. या घटनेमुळे तालुक्यात बाबा विरुद्ध वाणी असा संघर्ष पुन्हा पेटला आहे.
वैजापूर बाजार समितीच्या सभागृहात सोमवारी मासिक सभा होती. सकाळी अकरा वाजता सभा सुरू होताच सेनेचे संजय निकम व इतर संचालकांनी सभागृहातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो का काढला, तसेच सभागृहाचा भगवा रंग का बदलला, या कारणावरून सभापती काकासाहेब पाटील यांना आक्रमक शैलीत जाब विचारण्यास सुरुवात केली.
त्यामुळे काकासाहेब पाटील यांनी सुद्धा सेनेच्या संचालकांना अरेरावीची भाषा वापरण्यास सुरुवात केल्याने बैठकीत गोंधळ सुरु
झाला.
त्यावेळी संजय निकम यांचे सुपुत्र अजिंक्य याने हातात काळ्या शाईची बाटली सभापती काकासाहेब पाटील यांच्या अंगावर ओतली तसेच सेनेच्या काही संचालकांनी पाटील यांच्या तोंडाला काळे फासून धक्काबुक्की केली. एवढेच नव्हे तर सभापतींसमोर शेणही ठेवल्याने वातावरण चांगलेच तापले.
या घटनेनंतर वैजापूर पोलिसांनी मध्यस्थी करत संचालकांना समज देऊन हे प्रकरण मिटवले.

Web Title: Ink 'attack' on Vaizapur market committee chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.