नाविन्यपूर्ण उपक्रम! विद्यार्थ्यांनो इनोव्हेशन करा; ५ लाखांपर्यंत भांडवल मिळवा

By राम शिनगारे | Published: August 18, 2023 08:13 PM2023-08-18T20:13:01+5:302023-08-18T20:13:10+5:30

इनोव्हेशन चॅलेंजमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना नावीन्यता जोपासता येणार आहे.

Innovative activities! Students innovate; Get capital up to 5 lakhs | नाविन्यपूर्ण उपक्रम! विद्यार्थ्यांनो इनोव्हेशन करा; ५ लाखांपर्यंत भांडवल मिळवा

नाविन्यपूर्ण उपक्रम! विद्यार्थ्यांनो इनोव्हेशन करा; ५ लाखांपर्यंत भांडवल मिळवा

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : नवीन संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागांतर्फे स्टार्टअप धोरण जाहीर झाले आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी राज्य नावीन्यपूर्ण सोसायटीमार्फत महाराष्ट्र स्टुडंट्स इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन केले आहे. यात विद्यार्थ्यांना पाच लाखांपर्यंत बीजभांडवल मिळणार आहे. इनोव्हेशन चॅलेंजमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना नावीन्यता जोपासता येणार आहे.

काय आहे इनोव्हेशन चॅलेंज
राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन केले आहे.

३१ ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज
शैक्षणिक संस्थांसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट असून, विद्यार्थ्यांना अर्जासाठी १५ सप्टेंबर ही तारीख ठेवली आहे.

कोणाला करता येणार अर्ज
इनोव्हेशन चॅलेंजमध्ये पदवी, पदव्युत्तर, पदविकेचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सध्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त तीन जणांच्या समूहाला सहभाग नोंदवता येईल. तसेच अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे नावीन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करणार?
इनोव्हेशन चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी सुरुवातीला विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या संस्थांनी https://schemes.msins.in या पोर्टलवर नोंदणी करावी. त्यानंतर नोंदणी केलेला संस्थांमधील विद्यार्थ्यांना https://schemes.msins.in या पोर्टलवर नोंदणी करता येईल.

प्रत्येक जिल्ह्यातून १० विजेते
प्रत्येक जिल्ह्यातून १० विजेते निवडले जातील. त्यामध्ये ३० टक्के महिला आणि ५० टक्के विजेते हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून असतील.

सर्वोत्कृष्ट १०० संकल्पना निवडणार
जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या सर्वोत्तम दोन संकल्पनांमधून १०० संकल्पनांची जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड करण्यात येईल. त्यातून १० जणांची निवड जिल्हास्तरीय विजेत्यांसाठी होईल. जिल्हास्तरावर प्रत्येकी एक लाख, राज्यस्तरावर पाच लाखांचे भांडवल जिल्हास्तरावर निवड झालेल्या १० नवसंकल्पनांसाठी प्रत्येक एक लाख रुपयांचे तर राज्यस्तरावर १० विजेत्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बीजभांडवल देण्यात येणार आहे.

संधी हवी 
शहरातील उमेदवाराप्रमाणेच ग्रामीण भागातील सर्व घटकांतील उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिभा आहे. त्या विद्यार्थ्यांना संधीची आवश्यकता असते. अशी संधी या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे. त्याचा लाभ संस्था व उमेदवारांनी घ्यावा.
- सुरेश वराडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र

Web Title: Innovative activities! Students innovate; Get capital up to 5 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.