सिडकोकडून अतिक्रमणाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:04 PM2019-04-16T23:04:22+5:302019-04-16T23:05:00+5:30

सिडकोच्या पथकाने मंगळवारी सम्यक गार्डनिया परिसरात अतिक्रमणाची पाहणी केली. या पाहणीचा अहवाल लवकरच वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Insider trading inspection | सिडकोकडून अतिक्रमणाची पाहणी

सिडकोकडून अतिक्रमणाची पाहणी

googlenewsNext

वाळूज महानगर: सिडकोच्या पथकाने मंगळवारी सम्यक गार्डनिया परिसरात अतिक्रमणाची पाहणी केली. या पाहणीचा अहवाल लवकरच वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


सिडकोच्या कार्यक्षेत्रात येणाºया सम्यक गार्डनिया परिसरातील विविध व्यवसायिकांनी रस्त्याच्याकडेला व सर्व्हिसरोडवर अतिक्रमणे केल्याची तक्रार नरेंद्रसिंग यादव यांच्यासह रहिवाशांनी सिडकोकडे केली होती. याची दखल घेत मंगळवारी सहायक वसाहत अधिकारी गजाजन साटोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख किशोर बन्सोडे, संतोष निकाळजे, तारामती भिसे यांनी भेट देऊन अतिक्रमणांचा आढावा घेतला. यावेळी पथकाला सर्व्हिसरोडवर गॅरेज, हातगाड्या तसेच इतर व्यवसायिकांनी अतिक्रमणे केल्याचे दिसून आले. हा पाहणी करुन वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे पथकातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.


सिडकोने कही दिवसांपूर्वी सर्व्हिसरोडचे काम हाती घेतले होते. मात्र, काही व्यवसायिक व नागरिकांनी या कामावर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे हे काम रखडले आहे. सदरील परिसर अतिक्रमणमुक्त करुन लवकरात लवकर सर्व्हिस रोड काम सुरु करावे, अशी मागणीनरेंद्रसिंग यादव, चंद्रकांत चोरडयिा, सुनील भराटे, संजय महाजन, संदीप इनामके, बाळासाहेब डोळस, गिरीश गंगवाल आदींनी केली आहे.

Web Title: Insider trading inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.