दिवसभरात २ हजार ८९ नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:03 AM2021-03-06T04:03:56+5:302021-03-06T04:03:56+5:30

पाच शासकीय कार्यालयांमध्ये दोन जण पॉझिटिव्ह औरंगाबाद : शहरातील पाच वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांची शुक्रवारी तपासणी करण्यात आली. ...

Inspection of 2 thousand 89 citizens during the day | दिवसभरात २ हजार ८९ नागरिकांची तपासणी

दिवसभरात २ हजार ८९ नागरिकांची तपासणी

googlenewsNext

पाच शासकीय कार्यालयांमध्ये दोन जण पॉझिटिव्ह

औरंगाबाद : शहरातील पाच वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांची शुक्रवारी तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोन जण पॉझिटिव्ह आढळून आले. महापालिका मुख्यालयात ३० पैकी २ जण पॉझिटिव्ह आढळून आले. पोलीस आयुक्त कार्यालय ४२, जिल्हाधिकारी कार्यालय ८०, विभागीय आयुक्त कार्यालय ३५, आरटीओ कार्यालय ७५ नागरिकांची तपासणी केली.

रेल्वेस्टेशन, विमानतळावर १९३ प्रवाशांची तपासणी, ३ पॉझिटिव्ह

औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर १९३ प्रवाशांची तपासणी केली. गुरुवारी रेल्वेस्टेशनवर १०८ प्रवाशांची तपासणी केली होती त्यामधील तीन जण आज पॉझिटिव्ह आढळून आले. जाधववाडी भाजीमंडई येथे फक्त ९ जणांनी तपासणी केली.

३ मालमत्ता सील, एक नळ खंडित

औरंगाबाद : मालमत्ताकराच्या थकबाकीसाठी प्रशासनाने विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकाने शुक्रवारी दिवसभरात फक्त १ लाख ३२ हजार रुपये वसूल केले. तीन ठिकाणी मालमत्ता सील केल्या. थकबाकी न भरल्याने एका ठिकाणी नळ कनेक्शन खंडित करण्यात आले. विशेष पथकाकडून ज्या पद्धतीने वसुली व्हायला हवी तशी होत नसल्याचे दिसून येत आहे.

१९ हजार ६५० रुपये दंड वसूल

औरंगाबाद : महापालिकेच्या नागरीमित्र पथकाने गुरुवारी शहरात १९ हजार ६५० रुपये दंड वसूल केला. मास्क न लावलेल्या ३३ नागरिकांकडून १६ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले. याशिवाय वेगवेगळ्या कारणावरून नागरिकांना दंड आकारण्यात आला.

Web Title: Inspection of 2 thousand 89 citizens during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.