औरंगाबादसह मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 12:41 AM2018-07-01T00:41:33+5:302018-07-01T00:42:52+5:30
औरंगाबाद रेल्वेस्थानकासमोरील इंजिनची दुरुस्ती करण्यासह रस्ते, ड्रेनेज, परिसर सुशोभीकरण आदींची कामे १५ आॅगस्टपूर्वी करण्याचे आदेश विभागीय व्यवस्थापक त्रिकालयग्य रभा यांनी शनिवारी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्थानकासमोरील इंजिनची दुरुस्ती करण्यासह रस्ते, ड्रेनेज, परिसर सुशोभीकरण आदींची कामे १५ आॅगस्टपूर्वी करण्याचे आदेश विभागीय व्यवस्थापक त्रिकालयग्य रभा यांनी शनिवारी दिले.
नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालयग्य रभा, वरिष्ठ डीओएम विक्रमादित्य, वरिष्ठ डीएम नागपुरे, विवेक जैन, डीसीएम नेहा रत्नाकर, सेक्युरिटी कमांडंट पांडे यांचे पथक शनिवारी पहाटे ४ वाजता औरंगाबाद स्थानकात दाखल झाले. विभागीय पथकाचा पाहणी दौरा पूर्वनियोजित असल्याने स्टेशनमास्तरसह विविध विभागांचे अधिकारी स्वागतासाठी सज्ज होते.
सर्व विभागांतील अपडेटस् अधिकाऱ्यांनी तयार करून ठेवले होते. पथकाने सकाळी ८ वाजता विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर सकाळी ९ वाजता औरंगाबाद स्थानकातील तिकीट खिडकीसह पसिरातील रस्ते, गटार, इंजिन, बोर्डरूम्स व इतर भागांची पाहणी केली. परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना करून सुशोभिकरण करण्याचे आदेश पथकातील अधिकाºयांनी संबंधित अधिकाºयांना दिले. त्यानंतर देखभाल व दुरुस्ती विभागातील अधिकाºयांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या. तो वरिष्ठांकडे दाखल केला असेल, तर त्याच्या स्थितीची माहिती अधिकाºयांकडून पथकाने जाणून घेतली. याचा पाठपुरावा करून सर्व कामे पंधरा आॅगस्टपूर्वी करण्याचे आदेश रभा यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
भूमिगत पुलाची मागणी
सकाळी १०.३० वाजता मुकुंदवाडी स्थानकात पथक दाखल झाले. तेथील कामकाजाचा आढावा घेत स्वच्छता, पार्किंग, पथदिवे आदींबाबत काही सूचना अधिकाºयांना केल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी प्लॅटफॉर्म आणि रेल्वे डबा यांच्यात अंतर जास्त असल्याने अपघात वाढले आहेत. यावर उपाययोजना करण्याची मागणी रभा यांच्याकडे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोष सोमाणी यांनी केली, तसेच मुकुंदवाडी स्थानकाच्या समोरील बाजूला लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
या भागात वाहतुकीचा पर्यायी मार्ग नसल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांना रेल्वे रूळ ओलांडूनच दुसºया बाजूला यावे लागते. ते धोकादायक असून, यात एखाद्याचा बळी जाऊ शकतो. यावर उपाययोजना म्हणून भूमिगत पूल तयार करण्याची मागणी रभा यांच्याकडे करण्यात आली. यावर पुलाचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठविल्यास यावर विचार केला जाईल, असे रभा यांनी सांगितले. या पाहणीनंतर सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पथक जालना रेल्वेस्थानकाकडे मार्गस्थ झाले.