घाटीतील ऑक्सिजन प्लांटची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:03 AM2021-04-29T04:03:56+5:302021-04-29T04:03:56+5:30
पोलीस कर्मचाऱ्यांना अल्पोपाहाराची व्यवस्था औरंगाबाद: लॉकडाऊन सुरू असल्यामुळे पोलीस कर्मचारी रस्त्यावर आहेत. शिवाजीनगर येथे तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र अभियंता ...
पोलीस कर्मचाऱ्यांना अल्पोपाहाराची व्यवस्था
औरंगाबाद: लॉकडाऊन सुरू असल्यामुळे पोलीस कर्मचारी रस्त्यावर आहेत. शिवाजीनगर येथे तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र अभियंता सेनेतर्फे अल्पोपाहार आणि चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी अभियंता सेनेचे अध्यक्ष प्रवीण जाधव आदींची उपस्थिती होती.
रस्त्यावरील गतिरोधक उखडले
औरंगाबाद : सूतगिरणी चौक ते गजानन महाराज मंदिर आणि जयभवानीनगर ते पुंडलिकनगरमार्गे गजानन महाराज मंदिर या रस्त्यावरील गतिरोधक उभारण्याचे काम उखडले आहे. ते गतिरोधक दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. गतिरोधक नसल्यामुळे वाहने वेगाने धावत आहेत.
हायमास्ट वर्षापासून बंदच
औरंगाबाद : विश्रांतीनगर चौकातील हायमास्ट दीड वर्षांपासून बंद पडलेला आहे. त्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य कायम आहे. हायमास्ट दुरुस्त करण्याची मागणी नागरिक वारंवार करीत आहेत. मात्र, अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही.
जिल्हाध्यक्षपदी पुंड यांची निवड
औरंगाबाद: सत्यमेव जयते फाऊंडशेनच्या जिल्हाध्यक्षपदी विशाल पुंड यांची निवड करण्यात आली. फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष लखन मोरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले आहे.