अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची कृषी राज्यमंत्र्यांकडून पाहणी
By Admin | Published: October 11, 2016 12:30 AM2016-10-11T00:30:18+5:302016-10-11T00:32:28+5:30
लातूर : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची पाहणी सोमवारी केली.
उस्मानाबाद : यंदाच्या नवरात्रोत्सव कालावधीत आजवर देशासह विदेशातील तब्बल ६४ हजार ८०६ भाविकांनी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे आॅनलाईन दर्शन घेतले़ जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘आॅनलाईन’ दर्शनामुळे भाविकांना घरबसल्या श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेता आले़
जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने जिल्ह्याच्या संकेतस्थळावरून जनतेसाठी विविध विभागांच्या आॅनलाईन सेवा पुरविण्यात येत आहेत़ त्याचाच एक भाग म्हणून नवरात्रोत्सवात बहुतांशी भाविकांना घरबसल्या श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी संकेतस्थळावरून ई-लाईव्ह दर्शन ही सुविधा मागील तीन वर्षांपासून मंदिर प्रशासनाच्या सहाय्याने पुरविण्यात येत आहे.
सर्व भाविकांना यंदाच्या नवरात्रात सुविधा वापरणे सोयीस्कर होण्याकरिता राष्ट्रीय सूचना, विज्ञान केंद्रामार्फत उस्मानाबाद जिल्हा संकेतस्थळावरील मुख्य पान उघडताच ई-लाईव्ह दर्शन हे ठळकपणे दिसण्याची व त्याला क्लिक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात ६४ हजार ८०६ भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला. तसेच आजपर्यंत १२ लाख १२ हजार २६० भाविकांनी याचा लाभ घेतल्याचे दिसून येते.