गरवारे कंपनीची प्रदुषण मंडळाच्या पथकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 06:22 PM2018-11-27T18:22:48+5:302018-11-27T18:23:01+5:30

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील गरवारे कंपनीच्या प्रदुषणासंदर्भात लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच याची गंभीर दखल घेत प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने मंगळवारी कंपनीची पाहणी केली. या पथकाने नागरी वसाहतीतील काजळी व हवेचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त होताच संबंधित कंपनीविरुध्द कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 Inspector of Garware Company Pollution Board | गरवारे कंपनीची प्रदुषण मंडळाच्या पथकाकडून पाहणी

गरवारे कंपनीची प्रदुषण मंडळाच्या पथकाकडून पाहणी

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील गरवारे कंपनीच्या प्रदुषणासंदर्भात लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच याची गंभीर दखल घेत प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने मंगळवारी कंपनीची पाहणी केली. या पथकाने नागरी वसाहतीतील काजळी व हवेचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त होताच संबंधित कंपनीविरुध्द कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


वाळूज उद्योगनगरीतील गरवारे पॉलिस्टर या कंपनीच्या बॉयलरमधून सतत धूर व काजळी बाहेर पडत असल्याने प्रदूषण वाढले आहे.अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु असल्यामुळे या परिसरातील नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. कंपनीच्या या बॉयलरमधून बाहेर पडणारी काजळी ही या भागातील अविनाश कॉलनी, शिवाजीनगर, दत्त कॉलनी, गंगा कॉलनी, समता कॉलनी आदी नागरी वसाहतीत वाºयाबरोबर उडुन जात आहेत. या काजळीमुळे या नागरी वसाहतीतील भिंतीही काळवंडल्या असून , काजळीचे थर टेरेस व प्रांगणात साचत आहे.

याच बरोबर बॉयलरच्या चिमणीतून दररोज मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत असून, याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्य खालेदखॉ पठाण, माजी ग्रामपंचायत सदस्य सिध्देश्वर ढोले, लक्ष्मण पा.पाठे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनंतर सोमवारी कंपनीच्या अधिकाºयांनीही या परिसरातील नागरी वसाहतीला भेट घेतली असता त्रस्त नागरिकांनी तक्रारीचा पाढा वाचला होता.


प्रदूषण मंडळाच्या पथकाकडून पाहणी
प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम, क्षेत्र अधिकारी राजेश औटी आदींच्या पथकाने गरवारे कंपनीला भेट दिली. नागरी वसाहतीत साचलेल्या काजळीचे नमुने घेण्यात आले आहे. त्यानंतर पथकाने कंपनीच्या बॉयलरची पाहणी करुन बॉयलरची देखभाल व दुरुस्ती नियमितपणे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या. या विषयी कंपनीच्या एचआर विभागाचे अविनाश वाणी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.


तपासणी अहवालानंतर कारवाई
प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम म्हणाले की, गरवारे कंपनीच्या बॉयलरमधून बाहेर पडणारी काजळी व हवेचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार असून, अहवाल आल्यानंतर संबधित कंपनीविरुध्द कायदेशिर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


ग्रामपंचायतीने बजावली नोटीस
सरपंच पपीन माने, ग्रामपंचायत सदस्य सचिन काकडे, नंदकुमार राऊत, उत्तम बनकर, नंदु सोनवणे, अशोक उताडे आदींनी कंपनीच्या अधिकाºयांसोबत पाहणी केली. कंपनीच्या प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्यामुळे बॉयलरची चिमणी तात्काळ बंद करावी, अशी नोटीस बजावली असल्याचे सरपंच पपीन माने यांनी सांगितले.

Web Title:  Inspector of Garware Company Pollution Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.