शिक्षणाच्या वारीतून शिक्षक घेणार प्रेरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:57 PM2017-11-12T23:57:46+5:302017-11-12T23:57:49+5:30
शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच विद्यार्थ्यांची जलद गतीने प्रगती व्हावी यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ अंतर्गत ‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमाचे १९ नोव्हेंबर रोजी लातूर येथे आयोजन करण्यात आले आहे. वारीतून प्रेरणा घेण्यासाठी जिल्ह्यातील २५० शिक्षक लातूर येथे पाठविले जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच विद्यार्थ्यांची जलद गतीने प्रगती व्हावी यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ अंतर्गत ‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमाचे १९ नोव्हेंबर रोजी लातूर येथे आयोजन करण्यात आले आहे. वारीतून प्रेरणा घेण्यासाठी जिल्ह्यातील २५० शिक्षक लातूर येथे पाठविले जाणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाद्वारे शैक्षणिक विचारांची उपयोगिता व परिणामकारता यांच्या आदान-प्रदानासाठी शिक्षणाच्या वारीचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे. मागील वर्षीचे यशस्वी आयोजन झाल्याने यावर्षी नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या कालावधीत लातूर अमरावती, नाशिक रत्नागिरी येथे शिक्षणाची वारी शासनाने आयोजित केली आहे. त्याच पार्श्वभुमीवर हिंगोली येथील प्रत्येक तालुक्यातील ५० शिक्षक असे एकूण अडीचशे शिक्षक लातूर येथील शिक्षणाच्या वारीत सहभागी होणार आहेत. याबाबत सर्व शिक्षा अभियानकडून नियोजन केले जात असून लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे सर्व शिक्षाचे एपीओ एस. टी. भाले यांनी सांगितले. शिवाय गशिअ यांना मार्गदर्शन केले जाईल.