सातारा परिसरात रस्ते बनविण्याऐवजी खडी उचलण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:09 AM2019-05-03T00:09:10+5:302019-05-03T00:09:42+5:30

सातारा परिसरातील रस्त्याची कामे मनपाकडून तीन वर्षांपासून सुरू आहेत. नागरिकांनी आवाज उठविल्यावर ठेकेदार व अधिकारी थोड्या फार हालचाली करतात; परंतु आता तर रस्त्यावर टाकलेली खडी ट्रकमध्ये भरून नेण्याचा प्रकार तलाठी कार्यालयासमोरील रस्त्यावर घडल्याने नागरिकांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले.

Instead of making roads in the Satara area, | सातारा परिसरात रस्ते बनविण्याऐवजी खडी उचलण्याचा प्रकार

सातारा परिसरात रस्ते बनविण्याऐवजी खडी उचलण्याचा प्रकार

googlenewsNext

औरंगाबाद : सातारा परिसरातील रस्त्याची कामे मनपाकडून तीन वर्षांपासून सुरू आहेत. नागरिकांनी आवाज उठविल्यावर ठेकेदार व अधिकारी थोड्या फार हालचाली करतात; परंतु आता तर रस्त्यावर टाकलेली खडी ट्रकमध्ये भरून नेण्याचा प्रकार तलाठी कार्यालयासमोरील रस्त्यावर घडल्याने नागरिकांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले.
बायपासपासून ते अंतर्गत रस्त्यांवर खडी टाकून रस्ता तयार करण्याचे काम अगदी कासवगतीने सुरू आहे. रस्ता तयार होत असल्याने नागरिकांनीही अडचणीतून येणे-जाणे सहन केले आहे; परंतु रस्त्याला पूर्णत्वाकडे नेण्याऐवजी त्यावर टाकलेली खडीच ठेकेदाराने मजुरांमार्फत उचलून नेण्याचा अफलातून प्रकार समोर आला. नागरिकांनी खडी उचलून नेण्यास प्रचंड विरोध करीत मनपा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पावसाळ्यापूर्वी तरी रस्ता पूर्ण करावा, अशी अधिकाऱ्यांकडे विनंती केली आहे. सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. संघर्ष केल्याशिवाय नागरिकांना कोणतीच सेवा-सुविधा देण्यात येत नसल्याने परिसरात तीव्र नाराजीचा सूर आहे.
रेणुकामाता कमान, एमआयटी रस्ता, आमदार रोड, सुधाकरनगर रोड, आयप्पा मंदिरामागील अलोकनगरात जाणाºया रस्त्यावरही तीच अवस्था आहे. सर्वच रस्ते अपूर्ण अवस्थेत सोडले असून, रस्त्यावर टाकलेली खडीची दबाई करण्याऐवजी ती उचलून नेली जात असल्याने संताप व्यक्त होतो आहे.
नागरिकांच्या डोळ्यात धूळ झोकू नका
रस्ते तयार करण्याऐवजी खडी उचलून नेणाºयावर मनपाने गुन्हे दाखल करावेत, विकासकामांच्या नावाखाली नागरिकांच्या डोळ्यात धूळ झोकू नका.
-अरुण पाटील

अपूर्ण रस्ते त्वरित पूर्ण करा
सातारा-देवळाईतील रस्त्यांच्या रेंगाळलेल्या कामाकडे मनपाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे. पावसाळ्यापूर्वी तरी रस्ते पूर्ण करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल.
-शेखर म्हस्के
 

Web Title: Instead of making roads in the Satara area,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.