संस्थाचालक २ नोव्हेंबरला शैक्षणिक बंद पाळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 09:17 PM2018-10-23T21:17:05+5:302018-10-23T21:17:33+5:30
औरंगाबाद : राज्य शासनाच्या मनमानी कारभारविरोधात २ नोव्हेंबर रोजी संस्थाचालकांनी राज्यभरात एकदिवसीय शैक्षणिक बंदचा निर्धार केला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
औरंगाबाद : राज्य शासनाच्या मनमानी कारभारविरोधात २ नोव्हेंबर रोजी संस्थाचालकांनी राज्यभरात एकदिवसीय शैक्षणिक बंदचा निर्धार केला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
उद्धव भवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिक्षण संस्था बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. याची माहिती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक यांना मंगळवारी देण्यात आली.
राज्यातील शिक्षण क्षेत्रात सुरू असलेला असंतोष मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थाचालक असंतुष्ट आहेत. या क्षेत्रातील समस्येबाबत मुख्यमंत्री चर्चा करण्यासाठीही वेळ देत नाहीत, ही खेदाची बाब असल्याचे भवलकर यांनी सांगितले.
यामुळे २ नोव्हेंबर रोजी एकदिवसीय शाळा बंद आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्था, मुख्याध्यापक संघ, शिक्षकेत्तर संघटना, शिक्षक सेना, राष्ट्रवादी शिक्षक संघटना, मनसे शिक्षक सेना, मुप्टा, जुक्टा, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक संघटना, पुरोगामी शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनांसह इतर संघटनाही सहभागी होणार आहेत. या बैठकीला एस.पी. जवळकर, वाल्मीक सुरासे, मनोज पाटील, सलीम मिर्झा बेग, युनूस पटेल, मनोहर सुरगडे, सुनिल जाधव, प्रा. चंद्रकांत भराट, नामदेव सोनवणे, सुभाष महेर, प्रदीप विखे पाटील, शिवाजी बनकर, आनंद खरात आदी उपस्थित होते.