पोलीस आयुक्तांकडून पाहणी व तपासासंदर्भात सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:05 AM2021-06-03T04:05:52+5:302021-06-03T04:05:52+5:30

महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू खून झालेल्या अनोळखी महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहे. या महिलेचे वय ...

Instructions regarding inspection and investigation by the Commissioner of Police | पोलीस आयुक्तांकडून पाहणी व तपासासंदर्भात सूचना

पोलीस आयुक्तांकडून पाहणी व तपासासंदर्भात सूचना

googlenewsNext

महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू

खून झालेल्या अनोळखी महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहे. या महिलेचे वय अंदाजे ४५ वर्षे असून, रंग काळा-सावळा, चेहरा गोल, दोन्ही बाजूने नाक टोचलेले, उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ इंग्रजी ‘एस’ अक्षर गोंदलेले, डाव्या पायात काळा दोरा असे या अनोळखी महिलेचे वर्णन आहे. परिसरातून कुणी महिला बेपत्ता आहे का याची माहिती घेतली जात असून, सोशल मीडियावरून तिची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहे. या महिलेविषयी कुणाला काही माहिती असल्यास एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो ओळ - बजाजनगरात खून झाला त्या ठिकाणी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे-पाटील, सहा. आयुक्त विवेक सराफ, आदींनी भेट देऊन पाहणी केली.

------------------------

Web Title: Instructions regarding inspection and investigation by the Commissioner of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.