'आईवडिलांचा अपमान सहन होणार नाही'; व्हाट्सअपवर स्टेट्स ठेऊन दोन मित्रांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 06:54 PM2021-07-06T18:54:39+5:302021-07-06T18:59:20+5:30

Two friends commit suicide : युवकांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

'Insults to parents will not be tolerated'; Two friends commit suicide by posting statuses on WhatsApp | 'आईवडिलांचा अपमान सहन होणार नाही'; व्हाट्सअपवर स्टेट्स ठेऊन दोन मित्रांची आत्महत्या

'आईवडिलांचा अपमान सहन होणार नाही'; व्हाट्सअपवर स्टेट्स ठेऊन दोन मित्रांची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देआमच्यामुळे तुम्हाला कोणी वाईट बोलेल हे आम्हाला सहन होणार नाही. मृत्यूस जबाबदार आरोपींना पोलिसामार्फत फाशीची शिक्षा द्यायला लावा

सिल्लोड : तालुक्यातील पिंप्री येथे दोन मित्रांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. योगेश सुधाकर खिस्ते ( 23 ) व ज्ञानेश्वर गणेश शिरसाट ( 20 ) असे मृतांची नावे आहेत. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट व्हाट्सअपवर स्टेट्स म्हणून ठेवली होती. यावरून शेख मोईन, शेख मुश्ताक व एक महिला यांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (  Two friends commit suicide by posting status on WhatsApp) 

अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री योगेश सुधाकर खिस्ते व त्याचा मित्र ज्ञानेश्वर गणेश शिरसाट यांनी आम्ही आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट व्हाट्सअपवर स्टेट्सवर ठेवली. हे स्टेटस विजय आनंदा पवार यांनी पाहिले. त्यांनी दोघांना तत्काळ फोन लावला मात्र कोणीच फोन उचला नाही. यानंतर पवार यांनी भुसार मालाच्या गोडाऊनवर जाऊन पाहिले असता गोडाऊनमध्ये योगेश व ज्ञानेश्वर यांनी गळफास घेतल्याचे  निदर्शनास आले. विजय पवार यांनी तात्काळ ग्रामीण पोलिसांशी संपर्क करून दोन्ही युवकांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली. सपोनी प्रल्हाद मुंडे,पोलीस उपनिरीक्षक विकास आडे यांनी सहकार्यासोबत घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही युवकांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी सकाळी दोन्ही युवकांचे शवविच्छेदन करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दोन्ही मित्रांवर  पिंप्री येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत योगेश खिस्ते यांच्या पश्चात एक बहीण, एक भाऊ ,आईवडील तर ज्ञानेश्वर शिरसाठ याच्या पश्चात एक भाऊ,एक बहीण,आई वडील असा परिवार आहे. दरम्यान, याप्रकरणी युवकांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

आईवडिलांचा अपमान सहन होणार नाही
योगेश खिस्ते व ज्ञानेश्वर शिरसाठ या दोन्ही मित्रांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी लिहून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात, 'आईबाबा आम्हाला माफ करा. तुम्ही आम्हाला फार कष्ट करून मोठे केले पण आमच्यामुळे तुम्हाला कोणी वाईट बोलेल हे आम्हाला सहन होणार नाही. आमच्यावर शेख मोईन याने भोकरदन येथे खोटा गुन्हा दाखल केला आहे. मोईन हा त्याचा एक मित्र शेख मुश्ताक व एक महिलेला घेऊन लोकांच्या शेतात रात्री येत होता, आम्ही त्यांना पकडले. मात्र, त्याने आम्हालाच फसविण्याचा प्रयत्न केला. आम्हाला आमच्या आईवडिलांचा अपमान सहन होणार नाही. त्यामुळे आम्ही आत्महत्या करीत आहोत. आमच्या मृत्यूनंतर रडू नका. आमच्या बहिणीचे थाटात लग्न करा. आमच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोपींना पोलिसामार्फत फाशीची शिक्षा द्यायला लावा. आमच्या परिवाराला 30 लाख रुपये आर्थिक मदत द्या', असे नमूद केले आहे.

Web Title: 'Insults to parents will not be tolerated'; Two friends commit suicide by posting statuses on WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.