कोविड काळात इंटलेक्ट क्लासेस विद्यार्थ्यांसाठी ठरतेय वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:04 AM2021-06-30T04:04:27+5:302021-06-30T04:04:27+5:30
औरंगाबाद : कोविडमुळे १० वी, १२ वीची परीक्षा झाली नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. असंख्य ...
औरंगाबाद : कोविडमुळे १० वी, १२ वीची परीक्षा झाली नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. असंख्य विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात कधी वर्ग सुरू होतात याची प्रतीक्षा करत बसले आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील इंटलेक्ट क्लासेसने ऑनलाईन वर्ग सुरू केले व निराशेच्या खाईतून विद्यार्थ्यांना बाहेर काढले. एवढेच नव्हे तर हे ऑनलाईन क्लासेस विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरले. कारण, त्यांचा वेळ वाचला शिवाय अभ्यासात खंड न पडता सातत्य राहिले. उल्लेखनीय म्हणजे, मागील वर्षी ऑनलाईन शिक्षण घेऊन याच क्लासेसचे ९३ विद्यार्थी सीए फाऊंडेशन परीक्षा उत्तीर्ण झाले. हेच कोविड काळातील विद्यार्थी व क्लासेसचे मोठे यश आहे. या यशात मोठा वाटा असणारे इंटलेक्ट क्लासेसचे संचालक सीए सचिन लोया यांची ‘सीए डे’चे औचित्य साधून ‘लोकमत’ने विशेष मुलाखत घेतली..
सर्वप्रथम त्यांनी ‘ सीए डे’निमित्त सीए फाउंडेशन उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी व सर्व सीए यांना शुभेच्छा दिल्या.
(इंटलेक्ट क्लासेस एलएमएस मॅटर)