फौजदाराची कार चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला ग्रामीण पोलिसांकडून अटक
By | Published: November 26, 2020 04:12 AM2020-11-26T04:12:30+5:302020-11-26T04:12:30+5:30
औरंगाबाद : विविध शहरांतून कारचोरी करणाऱ्या आंतरजिल्हा पिता-पुत्रांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. या टोळीकडून तीन ...
औरंगाबाद : विविध शहरांतून कारचोरी करणाऱ्या आंतरजिल्हा पिता-पुत्रांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. या टोळीकडून तीन कार, मोटारसायकल आणि ७ मोबाईल, असा सुमारे २० लाखांचा ऐवज जप्त केला.
शेख दाऊद शेख मंजूर (रा. धाड, जि. बुलडाणा), त्याची मुले शेख नदीम दाऊद (२२), शेख जिशान शेख दाऊद (२८), सखाराम भानुदास मोरे (३१, रानीरखेडा, ता. जालना), दीपक दिगंबर मोरे (२०), अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी सांगितले की, देऊळगावराजा येथील फौजदार महेश किशोर भोसले हे कन्नड येथील मावशीच्या घरी कार घेऊन आले होते. २१ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांनी त्यांची कार (एमएच-२१ एएक्स-३००४) मावशीच्या घराजवळ उभी केली होती, तर मावस भाऊ यांनीही त्यांच्या मालकीची कार (एमएच-२० डीजे-६४८८) घराजवळ उभी केली होती. या दोन्ही कार चोरीला गेल्या. याप्रकरणी भोसले यांनी कन्नड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या घटनेचा तपास करीत असताना या कार आरोपी शेख दाऊद आणि त्याच्या मुलांनी पळविल्याची माहिती खबऱ्याने गुन्हे शाखेला दिली. पोलीस निरीक्षक फुंदे, उपनिरीक्षक संदीप सोळंके, हवालदार संजय काटे, दीपेश नागझरे, श्रीराम भालेराव, धीरज जाधव, संजय भोसले, नरेंद्र खंदारे ,रामेश्वर धापसे, योगेश तरमाळे आणि जीवन घोलप यांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणांहून शेख दाऊद आणि त्याच्या दोन्ही मुलांना उचलले. चौकशीदरम्यान पोलिसांनी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देत अन्य दोन साथीदारांची नावे सांगितली. चोरलेली कार चिखली (जि. बुलडाणा) येथे लपवून ठेवल्याची, तसेच एका कारचा क्रमांक बदल केल्याची माहिती दिली. चौकशीअंती सेलू येथून गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात कार चोरी केल्याची कबुली दिली. या तीन कार पोलिसांनी जप्त केल्या.
((चौकट आहे))