फौजदाराची कार चोरणारी पिता-पुत्रांची आंतरजिल्हा टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 06:37 PM2020-11-24T18:37:05+5:302020-11-24T18:42:38+5:30

आरोपींकडून तीन कारसह २० लाखाचा मुद्देमाल जप्त

An inter-district gang of fathers and sons who stole the car of a Inspector has gone missing | फौजदाराची कार चोरणारी पिता-पुत्रांची आंतरजिल्हा टोळी गजाआड

फौजदाराची कार चोरणारी पिता-पुत्रांची आंतरजिल्हा टोळी गजाआड

googlenewsNext
ठळक मुद्देफौजदाराच्या कारची सुद्धा चोरीस गेली होतीकार चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला ग्रामीण पोलिसांकडून अटक

औरंगाबाद: विविध शहरातून कार (विशेषतः स्विफ्ट कार ) चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. या टोळीकडून तीन कार, मोटर सायकल आणि ७ मोबाईल असा सुमारे २० लाखाचा ऐवज जप्त केला. शेख दाऊद शेख मंजूर (रा. धाड, जिल्हा बुलढाणा), त्याची मुले शेख नदीम दाऊद (२२) , शेख जीशान शेख दाऊद (२८), सखाराम भानुदास मोरे (३१, रानिरखेडा, ता . जालना ) अरे दीपक दिगंबर मोरे (२०) अशी आरोपींची नावे आहेत. 

याविषयी अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी सांगितले की. देऊळगाव राजा येथील रहिवाशी महेश किशोर भोसले हे कन्नड येथील मावशीच्या घरी कार घेऊन आले होते. २१ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांनी त्यांची कार क्रमांक (एम एच् २१ एएक्स ३००४) मावशीच्या घराजवळ उभी केली होती. तर मावस भाऊ यांनीही त्यांच्या मालकीची कार क्रमांक ( एम एच २० डीजे ६४८८) घराजवळ उभी करून ठेवली होती. या दोन्ही कार चोरीला गेल्याची घटना दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी भोसले यांनी कन्नड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. 

या घटनेचा तपास करीत असताना या कार आरोपी शेख दाऊद आणि त्याच्या मुलांनी पळविल्याची माहिती खबर्‍याने गुन्हे शाखेला दिली. पोलीस निरीक्षक फुंदे, उपनिरीक्षक संदीप सोळंके, हवालदार संजय काटे ,दीपेश नागझरे, श्रीराम भालेराव, धीरज जाधव, संजय भोसले, नरेंद्र खंदारे ,रामेश्वर धापसे,योगेश तरमाळे आणि जीवन घोलप यांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणाहून शेख दाऊद आणि त्याच्या दोन्ही मुलांना उचलले. चौकशीदरम्यान पोलिसांनी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देत अन्य दोन साथीदारांची नावे सांगितली. चोरलेली कार चिखली येथे (जिल्हा बुलढाणा )लपवून ठेवल्याची तसेच एका कारचा क्रमांक बदल केल्याची माहिती दिली. चौकशीअंती आरोपींनी सेलू येथून गत वर्षी ऑक्टोबर महिन्यात कार चोरी केल्याची कबुली दिली. या तीन कार पोलिसांनी जप्त केल्या असून पुढील तपास सुरु आहे. 

Web Title: An inter-district gang of fathers and sons who stole the car of a Inspector has gone missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.