क्रेडिट कार्डवर केली परस्पर खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:45 PM2019-07-19T23:45:56+5:302019-07-19T23:46:28+5:30
भारतीय स्टेट बँकेकडून क्रेडिट कार्ड मिळालेले नसताना, त्या कार्डचा वापर करून अज्ञाताने ५० हजार रुपयांची परस्पर खरेदी केल्याचे समोर आले
औरंगाबाद : भारतीय स्टेट बँकेकडून क्रेडिट कार्ड मिळालेले नसताना, त्या कार्डचा वापर करून अज्ञाताने ५० हजार रुपयांची परस्पर खरेदी करून वृद्धाची फसवणूक केल्याचे समोर आले. याविषयी वृद्धाने क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली.
पोलिसांनी सांगितले की, नागेश्वरवाडी येथील मुरलीधर भाऊराव दौड हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांचे भारतीय स्टेट बँकेत खाते आहे. त्यांनी बँकेकडे क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला नाही आणि एवढेच बँकेकडून त्यांना क्रेडिट कार्डही मिळाले नाही.
असे असताना कोणीतरी त्यांच्या नावाचे क्रेडिट कार्ड मिळवून त्यावर पन्नास हजार रुपयांची खरेदी केली. ३० जुलै २०१८ ते २ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत हा व्यवहार झाला. दरम्यान बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागाकडून त्यांना क्रेडिट कार्डचे बिल प्राप्त झाले. आपल्या नावे कुणीतरी क्रे डिट कार्ड तयार करून त्याचा वापर केल्याचे स्पष्ट झाल्याने दौड यांनी क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक अनिता बागूल तपास करीत आहेत.