पाणीपट्टीच्या थकबाकीवर आता व्याजाची आकारणी

By Admin | Published: November 28, 2015 12:44 AM2015-11-28T00:44:44+5:302015-11-28T00:47:46+5:30

औरंगाबाद : मालमत्ता कराप्रमाणे आता शहरवासीयांना पाणीपट्टीच्या थकबाकीवरही व्याजाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने पाणीपट्टीच्या

The interest charge on the water balance now | पाणीपट्टीच्या थकबाकीवर आता व्याजाची आकारणी

पाणीपट्टीच्या थकबाकीवर आता व्याजाची आकारणी

googlenewsNext


औरंगाबाद : मालमत्ता कराप्रमाणे आता शहरवासीयांना पाणीपट्टीच्या थकबाकीवरही व्याजाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने पाणीपट्टीच्या थकबाकीवर १८ टक्के वार्षिक दराने व्याजाची आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही आकारणी १ डिसेंबरपासून सुरू होणार
आहे.
महानगरपालिकेने शहराची पाणीपुरवठा यंत्रणा १ सप्टेंबर २०१४ पासून समांतरच्या ठेकेदार कंपनीकडे सोपविली आहे. तेव्हापासूनच पाणीपट्टी वसुलीचे कामही सिटी वॉटर युटिलिटी कंपनी करीत आहे. समांतर जलवाहिनी योजनेचे काम करणाऱ्या या कंपनीकडून दर दोन महिन्यांनंतर पाणीपट्टीची बिले वाटप केली जात आहेत. त्यातच आता या कंपनीने पाणीपट्टीच्या थकबाकीवर वार्षिक १८ टक्के दराने व्याज आकारणीचा निर्णय घेतला आहे.
३० नोव्हेंबरनंतर त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. आतापर्यंत मनपाकडून पाणीपट्टीच्या थकबाकीवर व्याज आकारणी होत नव्हती. कंपनीने पहिल्यांदाच अशा प्रकारे नियमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. मनपाने चालू वर्षापासून एप्रिल महिन्यापासून मालमत्ता कराच्या थकबाकीवर वार्षिक २४ टक्के दराने व्याज आकारणे सुरू केले आहे. याच नियमाचा आधार घेऊन कंपनीने पाणीपट्टीच्या थकबाकीवर व्याज आकारणीचा निर्णय घेतला आहे.
सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडून सप्टेंबर महिन्याचे पाणी बिलांचे वाटप झाले आहे; परंतु अनेक ग्राहकांना चुकीची बिले मिळाली आहेत. यातील काही बिले अव्वाच्या सव्वा आहेत. त्यामुळे ही बिले पाहून नागरिकांचे डोके चक्रावले.
४दरम्यान, कंपनीचे जनसंपर्क अधिकारी राहुल मोतियाळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ग्राहक सेवा केंद्रांवर चुकीची बिले दुरुस्त करून देण्यात येतील, असे सांगितले.
४कंपनीने शहरातील सर्व प्रभाग कार्यालयांत ग्राहक सेवा केंदे्र उघडली आहेत. मनपा प्रशासकीय इमारत, क्रांतीचौक, जुना मोंढा, सिडको कार्यालय, जवाहर कॉलनी पोलीस ठाण्याजवळ, अशा ठिकाणी ही ग्राहक सेवा केंद्रे कार्यरत असून, तिथे नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहनही मोतियाळे यांनी केले.

Web Title: The interest charge on the water balance now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.