नामांकित शेफ सर्वोत्तम पाककृती देण्यासाठी उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:30 AM2018-01-18T00:30:12+5:302018-01-18T00:30:18+5:30

विविध राज्यांतील चवदार, चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आपण उत्सुक असाल तर जरा थांबा. कारण विविध राज्यांतील नावीन्यपूर्ण ३०० खाद्यपदार्थांचा समावेश असलेला लोकमत टाइम्स फूड फेस्टिव्हल १९ ते २१ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. नामांकित शेफ त्यांच्या सर्वोत्तम पाककृती तयार करून आपणास खाऊ घालण्यासाठी उत्सुक आहेत. ही शहरातील खवय्यांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे.

Interested in giving nominated chefs the best recipes | नामांकित शेफ सर्वोत्तम पाककृती देण्यासाठी उत्सुक

नामांकित शेफ सर्वोत्तम पाककृती देण्यासाठी उत्सुक

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबाद येथे फूड फेस्टिव्हल : एकाच छताखाली विविध राज्यांतील खवय्येप्रिय पदार्थांची मिळणार मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विविध राज्यांतील चवदार, चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आपण उत्सुक असाल तर जरा थांबा. कारण विविध राज्यांतील नावीन्यपूर्ण ३०० खाद्यपदार्थांचा समावेश असलेला लोकमत टाइम्स फूड फेस्टिव्हल १९ ते २१ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. नामांकित शेफ त्यांच्या सर्वोत्तम पाककृती तयार करून आपणास खाऊ घालण्यासाठी उत्सुक आहेत. ही शहरातील खवय्यांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे.
क्रांतीचौक येथील हॉटेल मनोर येथे सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेदरम्यान फेस्टिव्हलमध्ये आपणास विविध पदार्थांच्या मेजवानीचा आनंद घेता येणार आहे. मुंबई, दिल्ली, सुरत, इंदोर, जोधपूर, अंबाला, कोलकाता, चेन्नई, ग्वाल्हेर आणि नेपाळ येथील अतिशय अनुभवी आणि नामांकित शेफ विविध अन्नपदार्थ तयार करणार आहेत. लोकमत टाइम्स फूड फेस्टिव्हलद्वारे विविध राज्यांतील अनेक खाद्यपदार्थ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येत आहेत. अशा प्रकारचा फूड फेस्टिव्हल भरविण्याची शहरातील ही पहिलीच वेळ ठरणार आहे. औरंगाबाद व संपूर्ण मराठवाड्यात अन्न संस्कृती विकसित करण्यासाठी हे फेस्टिव्हल मोठी संधी ठरणार आहे. सर्व खाद्यप्रेमींनी मोठ्या संख्येने या फूड फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊन विविध राज्यांतील पाककृतींचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजक आशू दर्डा यांनी केले आहे.
बच्चे कंपनीसाठी
मनोरंजनाचा खजिना
लहान मुलंही विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. सहपरिवार या फूड फेस्टिव्हलला भेट देणार आहेत. येथे येणाºया बच्चे कंपनीसाठी खास मनोरंजनाचा खजिना उपलब्ध करून देण्यात आला आहे. आयोजक आशू दर्डा यांनी सांगितले की, एक ते दहा वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी स्वतंत्र खेळ विभाग तयार करण्यात आला आहे. पॅसिफिक नॅचरल फिल्स विविध खेळ उपलब्ध करून देणार आहे. यामुळे बच्चे कंपनी खेळण्यात मग्न राहील. रामेश्वर पळसकर म्हणाले की, मुलांसाठी स्विइंग बोट, स्मॉल मेरी गो राऊंड, वॉटर बोट, टॉय गन, ट्रेम्पो लाईन, अशा खेळांचा समावेश आहे. यामुळे हे फेस्टिव्हल मुलांसाठी डबल धमाका ठरणार आहे.


खाद्यपदार्थांसोबत गीतसंगीताची मेजवानी
फूड फेस्टिव्हलमध्ये तीन दिवस चवदार खाद्यपदार्थ खाताना खवय्यांना गीतसंगीताच्या मेजवानीचा आनंद लुटता येणार आहे. यात गायक दीपक गिरी, औरंगाबाद करा ओके क्लबचे रतन नगरकर यांच्या नेतृत्वाखालील संघ लोकप्रिय गीत सादर करणार आहेत. याशिवाय विविध राज्यांतील लोककलाकार आपल्या राज्यांतील लोकनृत्य सादर करणार आहेत.

Web Title: Interested in giving nominated chefs the best recipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.