अतिप्रदान रक्कम वसुलीस अंतरिम स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:02 AM2021-06-25T04:02:27+5:302021-06-25T04:02:27+5:30
औरंगाबाद : जालना जिल्हा परिषदेतील श्रेणी कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आलेली अतिप्रदान रक्कम वसुलीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खडपीठाचे ...
औरंगाबाद : जालना जिल्हा परिषदेतील श्रेणी कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आलेली अतिप्रदान रक्कम वसुलीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी अंतरिम स्थगिती दिली आहे.
सुधारित वेतन संरचनेत वार्षिक वेतन वाढीवेळी याचिकाकर्त्यांचे वेतन बँडमधील वेतन कमाल टप्प्याच्या पुढे गेल्यामुळे जिल्हा परिषदेने २०१८-१९ च्या स्थानिक निधी लेखापरीक्षण अहवालानुसार संबंधित कर्मचाऱ्यांकडून अतिप्रदान रक्कम वसुलीचा आदेश दिला होता.
या आदेशाला दिलीप नाथाजी कांबळे व इतरांनी ॲड. प्रसाद कदम यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले आहे. खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश देऊन अतिप्रदान रक्कम वसुलीला अंतरिम स्थगिती दिली आहे. शासनातर्फे सहायक सरकारी वकील एस. एन. केंद्रे यांनी बाजू मांडली.